'जय हरी नामा'च्या गजरात दापोडी परिसरात पालखीचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

जुनी सांगवी (पुणे) : ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात पालखी वारी सोहळ्याचे दापोडी परिसरात भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. वारक-यांसाठी प्रतीवर्षाप्रमाणे जुनी सांगवी,नवी सांगवी,पिंपळे गुरव दापोडी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते,संस्थांनी सहभाग घेत सेवा पुरवली.
 महावितरण पिंपरी विभाग यांच्या कडून वारीतील वारकऱ्यांना प्रसाद म्हणून मुरमुऱ्याचा चिवडा वाटप करण्यात आला.

या उपक्रमात श्री शिवाजी शिवणेचरी, संजय जोगदंड, सागर लोखडे, हरीश मानकर, संदीप साळुंखे, सचिन शेरकर, माधव शिवणेचरी, हंबर्डे, ऋषिकेश भोसले, मिठू कुर्लेकर, रोहिणी चव्हाण, रमा इंगळे, सपना कठाळे, किशोर हनुमंते, पंकज चौधरी, यांनी नाशिक फाटा ते दापोडी येथे चिवडा वाटप केले. नाशिक फाटा ते दापोडी परिसरात वारक-यांसाठी शिवामृत पाणी उद्योजक दत्तात्रय भोसले, विजयसिंह भोसले यांनी जलसेवा पुरवली.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी दापोडी यांच्या तर्फे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची मधुमेह तपासणी करण्यात आली.  डॉ.वर्षा वसावे,डॉ. प्रिती थोरात यांनी वारकऱ्यांची तपासणी केली. ओम साई फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे गुरव येथे विसाव्याला थांबलेल्या वारक-यांना चहा,फराळाचे वाटप केले.संजय मराठे,तौफिक सय्यद यांनी चहा,बिस्किट,राजगीरा लाडुचे वाटप केले.

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत नगरसेविका स्वातीमाई काटे, राजु बनसोडे, रोहित आप्पा काटे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, चंद्रकांत काटे यांनी स्वागत केले यावेळी विविध सामाजिक संस्था व मंडळांनी पायीवारी करणाऱ्यांना वारकऱ्यांना अन्नदान,भेटवस्तु व आवश्यक साधन सामुग्री देण्यात आल्या.
 कडजाईमाता प्रासादिक दिंडी सांगुर्डी या दिंडी ला सलग १२ वर्ष दापोडी तील कृष्णा मोरे व शारदा मोरे यांच्या कडुन वारकऱ्यांना अन्न दान करण्यात आले. श्रीक्ष्रेत्र घोरिवडेश्वर सांप्रदायिक दिंडी ला बाबु एप्रे यांच्या तर्फे अन्नदान करण्यात आले तसेच बाबु एप्रे व सिमा एप्रे यांच्या हस्ते वारकऱ्यांना टाळ व मृदंग वाटप करण्यात आले. 

 कै.ह.भ.प.शांताराम बाईत प्रतिष्ठानच्या वतीने बिस्कटाचे वाटप केले.तर येथील बालाजी महिला प्रतिष्ठान,नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सकाळ दिंडीत सहभाग घेतला. 

Web Title: palakhi welcome in dapodi by citizens