‘पाली तिपिटक’चे खंड लवकरच मराठीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे - भगवान गौतम बुद्ध यांचे उपदेश, विचार यांचे संकलन असलेल्या पाली भाषेतील ‘पाली तिपिटक’ या तीन खंडांचे मराठीत भाषांतर केले जाणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारामुळे बुद्धांचे संपूर्ण विचार मराठीतून जाणून घेणे शक्‍य होणार आहे. या करारावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, आमदार गौतम चाबुकस्वार, पाली विभागप्रमुख डॉ. महेश देवकर, बार्टीचे प्रकल्प संचालक डॉ. आरती डोळस आदी उपस्थित होते. 

या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय्य आणि विशेष साह्यता विभागाने ‘बार्टी’च्या माध्यमातून चार कोटी ९५ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. हा भाषांतराचा प्रकल्प पाच वर्षांसाठी असणार आहे, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली.

‘पाली तिपिटक’ या तीन खंडांपैकी काही भागांचे मराठीत भाषांतर झाले आहे. या प्रकल्पातून तिन्ही खंड मराठीत उपलब्ध होणार आहेत. या खंडांचे मराठीतील भाषांतर मराठी वाचक आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. याद्वारे व्यापक पाली-मराठी शब्दकोषाची निर्मिती होऊ शकेल.
- डॉ. महेश देवकर, पाली विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Pali Tipitak Book in Marathi