sant dnyaneshwar maharaj and sant tukaram maharaj palkhi sohala
sakal
पुणे - आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि आकुर्डीत मुक्काम करून निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांच्या आगमनाने आज अवघी पुण्यनगरी विठ्ठलमय झाली होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे कळस येथे, तर तुकोबांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी बोपोडी येथे भक्तीसागर उसळला. ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम...’ या अखंड नामघोषांनी, टाळ-मृदंगाच्या गजराने सारा परिसर दुमदुमून गेला. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो भाविकांनी भक्तीभावाने फुलांची उधळण करत पालख्यांचे स्वागत केले.