esakal | Palkhi Route : पालखीमार्गांचे भूमिपूजन ऑक्टोबरमध्येच; नितीन गडकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

पालखीमार्गांचे भूमिपूजन ऑक्टोबरमध्येच; नितीन गडकरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी - आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासकामांचे भूमिपूजन १५ ते २५ आक्टोबर दरम्यान होईल. बारा हजार कोटींच्या या पालखी मार्गावर अत्याधुनिक सुविधा असतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

‘सहकार भारती’चे अकरावे महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशन, सहकार महर्षी ग्रंथ प्रकाशन आणि स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार प्रदानप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून गडकरी बोलत होते.

हेही वाचा: सातशे कंत्राटी कामगारांचे वेतन रखडले

आळंदीतील फ्रुटवाले धर्मशाळेत झालेल्या या कार्यक्रमात गडकरी यांच्या हस्ते स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार महेश लांडगे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, ओमप्रकाश कोयटे, शिवशंकर लातुरे, गणेश भेगडे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग हा दोनशे सव्वीस किलोमीटरचा आहे. सहा पॅकेजमधील हे काम असून यासाठी सहा हजार सातशे कोटींचा खर्च केला जात आहे. तीन टप्प्यातील काम सुरु आहे.भूसंपादनाचे काम सुरु असून बाजारभावापेक्षा दीडपट भाव देणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन टप्प्यात काम होणार आहे. यासाठी १३६ किलोमीटरसाठी साडे चार हजार कोटींच्या कामाला सुरुवात होईल. दीड वर्षांत संपूर्ण काम पूर्ण होईल. पालखी मार्ग भक्ती मार्ग बनवला जाईल. पालखी मुक्कामी वारकऱ्‍यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली जाईल.

loading image
go to top