esakal | पुणे : सातशे कंत्राटी कामगारांचे वेतन रखडले
sakal

बोलून बातमी शोधा

safai krmchari

सातशे कंत्राटी कामगारांचे वेतन रखडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या नगर रस्ता आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे ७२५ सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून पगार रखडले आहेत. हे थकीत वेतन त्वरित द्यावे अशी मागणी महापालिका कामगार युनियनने प्रशासनाकडे केली आहे.

शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने महापालिकेतर्फे कंत्राटी पद्धतीने कामगार घेतले जातात. ठेकेदाराकडून मनुष्यबळ पुरविले जात असताना त्यास शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात मजुरी देणे आवश्‍यक असते. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात ४०० तर येरवडा क्षेत्रीय कार्यालयात ३२५ कंत्राटी कामगार आहेत. त्यांना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यापासून वेतन अद्याप मिळालेले नाही. कामगारांनी संबंधित ठेकेदाराकडे वारंवार पगार मागून देखिल अद्याप पगार जमा झालेला नाही. तसेच याविरोधात क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. कामगारांना थकीत वेतन त्वरित मिळावे अशी मागणी युनियनच्या वतीने कार्याध्यक्ष चंद्रकांत गमरे, संयुक्त चिटणीस मधुकर नरसिंगे, राम अडागळे, मयूर खरात, सचिव नितीन ससाणे, संतोष लोंढे यांनी केली आहे.

हेही वाचा: Rave Party : आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी कोठडी!

उपायुक्त संजय गावडे म्हणाले, ‘‘ ज्या ठेकेदाराकडे मनुष्यबळ पुरविण्याचे काम आहे, त्याच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेत कारवाई झाली असून, त्यास पोलिसांनी अटक केली आहे, त्यामुळे त्यांचे वेतन देण्यात अडथळे आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या ठेकेदाराकडून या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात आहे. नगर रस्ता कार्यालयाकडे ४०० तर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडे ३२५ कामगार आहेत. प्रतिमहिना सुमारे ८० लाख रुपयांचा पगार दिला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम उपलब्ध होणे शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने वेतन दिले जात आहे. नुकतेच दोन महिन्यांचे वेतन दिले असून पुढील १५ दिवसात उर्वरित दोन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे.

loading image
go to top