हलगर्जी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

वरवंड - संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामांबाबत ग्रामस्थांसोबत चर्चा करताना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर.
वरवंड - संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामांबाबत ग्रामस्थांसोबत चर्चा करताना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर.

पुणे - पालखी तळांवरील हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात पडल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्व हायमास्ट दिव्यांची भक्‍कम उभारणी करण्यासाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात. या कामासह अन्य सुविधांबाबत हलगर्जी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला.

डॉ. म्हैसेकर यांनी संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामांसह मुक्कामांच्या ठिकाणांची पाहणी केली. या वेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने आदी उपस्थित होते.

दौंड तालुक्‍यातील वरवंड येथील पालखी तळाला डॉ. म्हैसेकर यांनी भेट दिली. त्या वेळी ग्रामस्थांनी पालखी तळावरील हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात कोसळल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत त्यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

नीरा-नरसिंहपूरला भेट 
तीर्थक्षेत्र विकास निधीतून काम सुरू असलेल्या नीरा-नरसिंहपूर देवस्थानलाही डॉ. म्हैसेकर यांनी भेट दिली. त्या ठिकाणी सुरू असणाऱ्या विकासकामांची पाहणी त्यांनी केली. तसेच, या कामांना गती देऊन कामाचा दर्जा चांगला राखण्याबाबत सूचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com