वैष्णवांच्या सोयीसाठी इंदापूरच्या तहसीलदारांनी केला रात्रीचा दिवस

राजकुमार थोरात
गुरुवार, 19 जुलै 2018

तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी गेल्या पावणेदोन वर्षापूर्वी इंदापूरचा कार्यभार सांभाळण्यास सुरवात केल्यापासुन तालुक्यातील महसूल सह सर्वच विभागातील कर्मचारी सुतासारखे सरळ झाले आहे.

वालचंदनगर - पहाटे साडेतीन चार पर्यंत जागायचे...व पुन्हा सकाळी लवकर उठून सकाळी सहा वाजताच पालखी तळ गाठायचा...वेळ प्रसंगी चालू गाडीमध्ये झोपेचा डुलका घ्याचा...इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी रात्रीचा ही दिवस करुन वारकऱ्यांची काळजी घेतली. त्यांनी पालखी सोहळ्याच्या काळामध्ये गतवर्षीपासुन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यास सुरवात केल्यामुळे  इंदापूर तालुक्यातुन सात पालखी सोहळे पंढरपूरकडे विनासायास मार्गस्थ झाले.

तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी गेल्या पावणेदोन वर्षापूर्वी इंदापूरचा कार्यभार सांभाळण्यास सुरवात केल्यापासुन तालुक्यातील महसूल सह सर्वच विभागातील कर्मचारी सुतासारखे सरळ झाले आहे. वाळू माफिया भूमीगत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पाटील यांनी गतवर्षीपासुन पालखी सोहळ्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अमंलबजावणी करण्यास सुरवात केली. हा पॅर्टन चालू वर्षी संपूर्ण जिल्हामध्ये राबविण्यात आला. त्यांनी प्रत्येक मुक्काच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथकाची स्थापना करुन एका प्रमुखाची नेमणूक केली.  प्रमुखाच्या अधिपत्याखाली प्रशासन , पोलिस, आरोग्य,बांधकाम, विद्युत, अन्न व भेसळ, पाणी पुरवठा व परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूका  केल्या. तसेच भरारी पथकाची ही नेमणूक करुन प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला लेखी कामाचा आदेश देवून संबधीत कामाची जबाबदारी देण्यात आली. तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने शनिवार (ता.१४) प्रवेश केला. व बुधवार (ता. १८) रोजी पालखी सोहळ्याने इंदापूर तालुक्यातुन सोलापूर जिल्हामध्ये प्रवेश केला. या दरम्यान तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी रात्रीचा दिवस करुन पालखी सोहळ्याचे चोख नियोजन केले. पालखी सोहळा सणसर मुक्कामी असताना पाटील पहाटे ४ वाजता घरी गेले. व सकाळी सहा वाजता आघोंळ पुन्हा बेलवाडीमधील रिंगण सोहळ्यासाठी हजर राहिले.अनेक वेळा त्यांनी प्रवासादरम्यान गाडीमध्ये झोपचा डुलका घेतला. पालखी सोहळा येण्यापूर्वी आठ दिवस त्यांनी पालखी मार्गावरील सर्व गावामध्ये भेटी देवून सुचना दिला. त्यांच्या योग्य नियोजनामुळे तालुक्यातील संत तुकाराम महाराज,संत सोपानदेव महारात , संत संतराज महाराज यांच्यासह अनेक संताच्या पालख्या तालुक्यातुन पंढरपूरकडे विनासायास मार्गस्थ झाल्या.     

सराटीमध्ये वारकऱ्यांची घेतली योग्य काळजी...
चालू वर्षी  सराटीमध्ये नीरा नदीमध्ये १५ फुटापेक्षा जास्त पाण्याची पातळी होती. पालखी सोहळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना होवू नये म्हणून तहसीलदार पाटील यांनी सराटीमधील छोट्या पुलावरील वाहतुक बंद केली होती. तसेच पाण्यामध्ये पाच फुटापर्यंत वारकऱ्यांना जाण्याची परवानगी देवून पाच फुटाच्या पुढे पाण्यामध्ये जाळीचा वापर करुन पुढे जाण्याच प्रतिबंध केला होता. तसेच पुढे धोक्याचे झेंडे लावले होते.

सराटी (ता. इंदापूर) संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे चोख नियोजन केल्यामुळे इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उजवीकडून पालखी सोहळा प्रमुख सुनिल मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, प्रांतधिकारी हेमंत निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व तहसीदार पाटील.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Palkhi Sohla at Indapur valchandnagar pune