
सागर आव्हाड
घुंगरांचा छनछनाट, ढोलकीची थाप तसेच लावण्यवतींचा शृंगार बाराही महिने अनुभवास येतोपण ऐरवी शिट्ट्या आणि लावणी नृत्याच्या कलाविष्काराने गजबजलेल्या चौफुला येथील कला केंद्रात वारी ते बारी हा आगळावेगळा कलाविष्कार फुलला होता तो केवळ वारकरी भक्तांच्या सेवेमुळे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आगमनानिमित्ताने टाळ मृदुंगाचा गजर आणि घुंगरांचा छनछनाट असा अनोखा कला आणि भक्तीचा संगम पाहायला मिळाला.