उंडवडी सुपे येथे बांधबधिस्ती कामाचा शुभारंभ

विजय मोरे
सोमवार, 7 मे 2018

उंडवडी- उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेअंतर्गत विविध जलसंधारणाची कामे व्हावीत. यासाठी भारतीय जैन संघाच्या वतीने जेसीबी मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्ती या कामाचा शुभारंभ भारतीय जैन संघटनेचे बारामती तालुकाध्यक्ष आनंद छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला. 

उंडवडी- उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेअंतर्गत विविध जलसंधारणाची कामे व्हावीत. यासाठी भारतीय जैन संघाच्या वतीने जेसीबी मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्ती या कामाचा शुभारंभ भारतीय जैन संघटनेचे बारामती तालुकाध्यक्ष आनंद छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक दिलीप शिंदे, पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक धोंडीबा कर्चे, सरपंच एकनाथ जगताप, उपसरपंच पोपट गवळी, माजी सरपंच बापूराव गवळी, ग्रामपंचायत सदस्या रेणुका गवळी, रंजना गवळी, मंगल गवळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय गवळी, सुनिल भोसले, विलास गवळी, शहाजी गवळी तसेच पानी फाउंडेशन टिमचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. 

उंडवडी सुपे या गावाने यंदा पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात भाग घेतला आहे. या उपक्रमात श्रमदानातून व पोकलेन मशिनद्वारे विविध जलसंधारणाची कामे करावयाची आहेत. त्यानुसार येथे गावकऱ्यांनी श्रमदानातून सलग समतल चर व बांधबधिस्तीची कामे सुरु केली आहेत.

तसेच या उपक्रमाअंतर्गत काही कामे पोकलेन व जेसीबी मशिनद्वारे केली जाणार आहेत. यामध्ये शेततळे, बांधबधिस्ती व खोल सलग समतल चर या कामाचा समावेश आहे.

याकामांसाठी भारतीय जैन संघटनेने जेसीबी मशिन उपलब्ध करुन दिले आहे. या पोकलेन मशिनला शासनाकडून दिड लाखाचे डिझेल भरण्यात येणार आहे. अशी माहिती सरपंच एकनाथ जगताप व उपसरपंच पोपट गवळी यांनी दिली. 

यावेळी आनंद छाजेड म्हणाले, "भारतीय जैन संघटनेच्या वतीने आम्ही तालुक्यातील पाणी फाउंडेशन उपक्रमातील  12 गावात जलसंधारणाची विविध कामे करण्यासाठी 17 पोकलेन 7 जेसीबी आत्तापर्यंत दिले आहेत. यामध्ये सदर गावात पोकलेन 100 तास तर जेसीबी 250 तास जलसंधारणाचे काम करणार आहे. तसेच एखाद्या गावाने जास्त तास मशिन मागितले. तरी देखील आम्ही देत आहोत. त्यामुळे संबंधित गावानी एकत्रित येवून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करणे गरजेच आहे. म्हणजे भविष्यात गाव टॅंकरमुक्त होवून पाणीदार होण्यास मदत होईल." 

Web Title: pani foundation work at untavadi supe