पानसरेंच्या भाजप प्रवेशामुळे आघाडी झाली अपरिहार्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

पिंपरी : आझम पानसरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (एनसीपी) बडा नेता भाजपच्या गळाला लागल्याने आगामी पालिका निवडणुकीसाठी "एनसीपी'ला आता शहरात सद्दी संपू लागलेल्या कॉंग्रेसशी नाइलाजाने पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करावी लागणार आहे. तर, युतीची इच्छा नसलेल्या भाजपलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शिवसेनेला टाळी द्यावी लागणार आहे.

पिंपरी : आझम पानसरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (एनसीपी) बडा नेता भाजपच्या गळाला लागल्याने आगामी पालिका निवडणुकीसाठी "एनसीपी'ला आता शहरात सद्दी संपू लागलेल्या कॉंग्रेसशी नाइलाजाने पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करावी लागणार आहे. तर, युतीची इच्छा नसलेल्या भाजपलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शिवसेनेला टाळी द्यावी लागणार आहे.

एकहाती सत्तेत येण्याची मनीषा असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी यांना खरे, तर युती आणि आघाडी करण्याची मनापासून इच्छा नाही. मात्र, वरकरणी ते तसे भासवीत आहेत. परिणामी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी फक्त शिवसेनेचे शहराचे प्रतिनिधित्व करणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच टाळीसाठी हात पुढे केला आहे.मात्र, ती अद्याप वाजलेली नाही. ही चर्चा प्राथमिक स्तरावरच असल्याने अंतिम चर्चा वा बैठक अद्याप झाली नसल्याचे काल (ता.9) जगताप यांनी "सकाळ' ला सांगितले. त्यामुळे भाजप युतीबाबत किती इच्छुक आहे, हे दिसून आले. तर शिवसेनेचे शहराचे दुसरे खासदार आणि जगताप यांचे कट्टर यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी श्रीरंग तथा अप्पा बारणे यांना युतीसाठी विचारणाही झाली आहे. त्यामुळे युती होण्यात अडथळा येऊ शकतो. दुसरीकडे हा निर्णय पक्षप्रमुखच घेणार असल्याने त्याबाबत शिवसेनेचे दोन्ही खासदार, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे आणि शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, जिल्हा परिषदांत युतीची ताकद कमी असल्याने तेथे व महापालिकांत युती करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे या कारणामुळे पानसरे यांच्यासारखा मोहरा हाताला लागल्याने युतीची इच्छा नसतानाही वरील कारणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला बदललेल्या या राजकीय समीकरणामुळे युती करावी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आता आघाडीही होणार पानसरेंसारखा तगडा नेता गेल्याने पुन्हा सत्तेत येऊ पाहणाऱ्या व आतापर्यंत आघाडीसाठी कॉंग्रेसला विचारपूसही न केलेल्या एनसीपीला आता अनिच्छेने का होईना आघाडी करण्याची पाळी आली आहे. त्यात आणखी फाटाफूट होऊन एनसीपीचा आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असून काही नगरसेवकही कमळ हातात घेणार असल्याने मतांची फाटाफूट टाळून सत्ता टिकविणे या उद्देशातून उद्योगनगरीत घायाळ होत असलेल्या एनसीपीला पूर्ण घायाळ झालेल्या कॉंग्रेसशी सलगी करण्याची वेळ आता आली आहे.

Web Title: pansare's bjp entry forces ncp congress alliance