
खडकवासला : पानशेत धरण परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे आज (मंगळवार) सकाळी ११ वाजता सुरू असलेला ३९९६ क्युसेक विसर्ग वाढवून सांडव्याद्वारे ५९०८ क्युसेक व विद्युत केंद्राद्वारे ६०० क्युसेक असा एकूण ६५०८ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे उपविभागीय अभियंता मोहन शांताराम भदाणे यांनी कळविले.