बारामती - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 150 नवीन घरकुले

मिलिंद संगई
मंगळवार, 29 मे 2018

बारामती (पुणे) : शहरातील सर्व्हे क्रमांक 220 मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 150 नवीन घरकुले उभारण्याचा निर्णय बारामती नगरपालिका घेणार आहे.

नगरपालिकेच्या हिश्शातून या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात येणार असून या साठी लाभार्थ्यांची यादीही तयार झाल्याची माहिती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार नगरपालिका वेगाने या विषयावर काम करीत आहे. 

या ठिकाणी या पूर्वी 178 घरकुलांची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी एकूण 328 घरांची मंजूरी आहे, त्या मुळे उर्वरित 150 घरकुले येथे उभारता येऊ शकतात. त्या नुसार नगरपालिकेच्या स्वहिश्श्यातील रक्कम अगोदर खर्चून इमारत उभारण्यास सुरवात करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बारामती शहर झोपडपट्टीमुक्त करुन प्रत्येकाला छोटे का होईना हक्काचे पक्के घर देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहिरनाम्यात दिले होते, शिवाय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी घरकुलांबाबत ग्वाही दिली होती, त्या नुसारच नगरपालिका या घरकुलांची निर्मिती हाती घेणार आहे. 

इतर सहा जागीही घरकुले होणार
दरम्यान बारामती ग्रामीण, जळोची व तांदूळवाडी या तीन विभागात सहा भूखंडांवर बेघरांसाठी घरे निर्मितीसाठी आरक्षण निश्चित केलेले आहे. या सहा भूखंडांवर घरनिर्मितीसाठी नगरपालिकेने जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हाधिका-यांनी या जागेची मोजणी करण्याचे निर्देश दिलेले असून नगरपालिकेने मोजणीसाठी शासकीय शुल्क भरलेले असून येथेही नव्याने घरकुलांची निर्मिती सुरु करण्यासाठी नगरपालिकेकडून वेगाने काम सुरु आहे. या सहा भूखंडांवर 2470 घरकुलांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट नगरपालिकेने निश्चित केले आहे. 
 
Web Title: pantpradhan awas yojana planned 150 new homes in baramati