esakal | दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बस सेवेचा वाढदिवस करणारे परमहंस नगर
sakal

बोलून बातमी शोधा

In Paramahansa Nagar in Kothrud, the birthday of the bus service is celebrated every year on the day of Padva.jpg

कोथरुडमधील पौडरस्त्यावर वसलेल्या परमहंस नगरमध्ये दरवर्षी पाडव्याच्या दिवशी, न चुकता बस सेवेचा वाढदिवस साजरा केला जातो.

दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बस सेवेचा वाढदिवस करणारे परमहंस नगर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड (पुणे) : कोथरुडमधील पौडरस्त्यावर वसलेल्या परमहंस नगरमध्ये दरवर्षी पाडव्याच्या दिवशी, न चुकता बस सेवेचा वाढदिवस साजरा केला जातो. कोरोना महामारीच्या काळात हा वाढदिवस होईल की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. परंतु परमहंस नगर मधील ज्येष्ठांनी आपला हा आवडता उपक्रम नेहमीच्याच उत्साहाने साजरा केला.

बसची पूजा करुन चालक दीपक लोंढे आणि वाहक गजेंद्र दिघे यांना प्र. स. दंडवते यांच्या हस्ते श्रीफल, पुष्पगुच्छ आणि मिठाईचा पुडा देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष के.आर.पाटील, सु.ग.गोसावी, नीलेश घाडोळे, अविनाश हळबे, सुषमा कालूरकर, विजया डांगी उपस्थित होते.

हे ही वाचा : लीओ क्लबच्यावतीने रस्त्यावर राहणाऱ्या गरजूवंतांना दिवाळी फराळाचे वाटप

चालक दीपक लोंढे म्हणाले की, पीएमपीएल आणि पुणेकर यांचे भावनिक नाते आहे. पुण्याची जीवन वाहिनी असलेल्या पीएमपीएल ला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी पुणेकरांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. असेच उपक्रम ठिकठिकाणी राबविले गेल्यास अधिक सौहार्द निर्माण होऊन बससेवेची कार्यक्षमता आणि वापर निश्चित वाढेल.

प्र.स.दंडवते म्हणाले की, शहरात जाण्यासाठी 1987 साली परमहंसनगर ते डेक्कन जिमाखाना बसमार्ग क्रं. 102 पाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झाला. यथावकाश हा मार्ग लोहगावपर्यंत वाढविण्यात आला. तेव्हापासून सलग 33 वर्षे आम्ही वाढदिवस साजरा करत आहोत.