राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

राज्यातील 'दुष्काळी' जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस

पुणे : राज्यात (maharashtra) यंदा आतापर्यंत सर्वाधिक पाऊस परभणी (parbhani) येथे पडला आहे. त्या खालोखाल जालना (jalna) आणि बीड (beed) जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. परभणी (parbhani) येथे तेथील सरासरीपेक्षा ५१ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. त्याच वेळी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील (vidarbh) सात जिल्हे तहानलेले आहेत.

राज्यात या वर्षीच्या पावसाळ्यात सात जिल्ह्यांमध्ये तेथील सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के जास्त पाऊस पडला. त्यात मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर तर दुष्काळी जिल्हे असलेल्या परभणी, जालना आणि बीड येथे पावसाच्या दमदार सरी कोसळल्या आहेत.

हेही वाचा: कल्याण डोंबिवलीतील दुर्मिळ वृक्षांची नोंद होणार

राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये पावसाने जेमतेम सरासरी गाठली. तेथे सरासरीच्या तुलनेत २० ते उणे २० टक्के पावसाची नोंद झाली. यात पुणे, मुंबईसह पालघर, रायगड, कोल्हापूर, सांगली, नगर, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील नंदूरबार, धुळे, जळगांव, बुलडाणा, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे.

हेही वाचा: रिक्षाचालकांच्या 'पाम'वर करा तक्रारी, कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांनी तयार केले ऍप 

राज्यात ५ टक्के पाऊस

राज्यात १ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान पडणाऱ्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत पाच टक्के पाऊस पडला. राज्यात या कालावधीत ७२१.१ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा ७५४.७ मिलिमीटर (५ टक्के) पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

टॅग्स :pune