रिक्षाचालकांच्या 'पाम'वर करा तक्रारी, कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांनी तयार केले ऍप 

रिक्षाचालकांच्या 'पाम'वर करा तक्रारी, कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांनी तयार केले ऍप 

ठाणे : रिक्षाचालकांनी भाडे नाकारणे, प्रवाशांशी अरेरावी, दुप्पट भाडे आकारणे अशा अनेक समस्यांनी कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त असतात. वाहतूक विभाग, आरटीओ यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर कारवाई होते. मात्र, काही प्रवासी तक्रार करण्यात एवढा वेळ कुठे आहे म्हणून रिक्षाचालकांची मुजोरी सहन करतात. याची दखल घेत प्रोटेस्ट अगेंस्ट ऑटोवाले मंच यांच्यावतीने "पाम' (PAAM) हे मोबाईल ऍप तयार करण्यात आले असून, त्याद्वारे प्रवाशांना रिक्षा, टॅक्‍सी चालकांची एका क्‍लिकवर आरटीओ आणि वाहतूक विभागाकडे तक्रार करता येणार आहे. प्रवाशांनी प्रवाशांसाठी तयार केलेले हे पहिलेच ऍप आहे. 

प्रोटेस्ट अगेंस्ट ऑटोवाले मंचचे सभासद तुषार बापटे यांनी हे ऍप विकसित केले आहे. गेले वर्षभर मंचच्या वतीने त्याच्यावर काम सुरू होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर मंचचे अध्यक्ष प्रमोद काणे यांच्या हस्ते या "ऍप'चा ई-लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी सचिन गवळी, विशाल नलावडे, सागर भुणे, अल्पा खोणा हे सभासदही उपस्थित होते. हे ऍप सध्या ऍन्ड्राईड मोबाईलवर उपलब्ध आहे. भविष्यात इतर शहरातील वाहनांच्या तक्रारीही त्या-त्या विभागातील आरटीओ, वाहतूक विभागाशी संलग्न करता येतील का, यावर आमचा अभ्यास सुरू असल्याचे तुषार बापटे यांनी सांगितले.

कल्याण, डोंबिवली, ठाकुर्लीतील जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेण्यास होणारा विलंब किंवा तक्रार करण्यासाठी वाहतूक विभाग किंवा आरटीओचे कार्यालय गाठणे, ई-मेल करणे या किचकट प्रक्रियेतून प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून हे ऍप विकसित केल्याचे मंचचे सभासद सचिन गवळी यांनी सांगितले. 

ऍपची वैशिष्ट्ये... 

  • आरटीओने मान्यता दिलेले "रेट कार्ड' या ऍपवर उपलब्ध आहे. प्रवाशांना इच्छित स्थळाचे मीटरचे भाडे पाहणे शक्‍य होईल. 
  • इच्छित स्थळाचे अंतर किती, त्याचे शेअर आणि मीटरनुसार किती भाडे होईल हे ऍपद्वारे समजेल. 
  •  MH 04 आणि MH 05 या आरटीओ नोंदीच्या वाहनांची तक्रार करता येणार आहे. 
  • रिक्षा-टॅक्‍सीप्रमाणेच दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांच्या तक्रारीची सुविधा 
  • तक्रारीची आरटीओ आणि वाहतूक विभागाकडे अधिकृत नोंद होणार आहे. 
  • आरटीओ व वाहतूक विभागाचे हेल्पलाईन क्रमांक ऍपमध्ये समाविष्ट केले आहेत. 
  • तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. 

---------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com