

Maharashtra Pardhi Community Issues Tribal Commissioner Leena Bansod Gets Emotional After Hearing Activists Concerns
esakal
मंचर : ‘आम्ही गुन्हेगार म्हणून जन्मलो, गुन्हेगार म्हणूनच मरणार का? आम्हाला माणूस म्हणून समाज स्वीकारणार की नाही?’ असा आर्त सवाल पारधी समाजाचे कार्यकर्ते रविंद्र भोसले व पुणे जिल्हा पारधी समाजाचे नेते मंगेश भोसलेयांनी उपस्थित केला. त्यांच्या या भावनिक मनोगताने आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पारधी समाजाच्या व्यथा आणि समस्या ऐकून घेत राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.