esakal | ताई, दादा...आमच्या मुलांना भारतात परत आणा हो; पालकांची हाक
sakal

बोलून बातमी शोधा

ताई, दादा...आमच्या मुलांना भारतात परत आणा हो; पालकांची हाक

रशियातील कझान या प्रांतातील विविध महाविद्यालयात अडकून पडलेल्या 250 विद्यार्थ्यांना भारतात परत आणावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

ताई, दादा...आमच्या मुलांना भारतात परत आणा हो; पालकांची हाक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : रशियातील कझान या प्रांतातील विविध महाविद्यालयात अडकून पडलेल्या 250 विद्यार्थ्यांना भारतात परत आणावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलत या विद्यार्थ्यांना मुंबईत आणावे, असे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील 250 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाच्या कझान प्रांतातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. कोरोनानंतर या विद्यार्थ्यांना घराची ओढ लागून राहिली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प असल्याने या विद्यार्थ्यांना परतण्याचे मार्ग बंद झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात लक्ष घालून या मुलांना तातडीने महाराष्ट्रात तेही मुंबईत परत आणावे, अशी मागणी होत आहे. रशियातील मुले आता व्याकुळ झाली असून, अनेकांना निराशेने ग्रासले असल्याचे पालकांनी सांगितले. यात मुलींची संख्या अधिक आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीचे पालक नरेंद्र पंड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरातील दोन मुले रशियात आहेत. त्यांना परतण्यासाठी विमानाचे तिकीट 50 हजार रुपये तर भारतात परतल्यावर दिल्ली येथे सशुल्क विलगीकरण कक्षामध्ये 14 दिवस वास्तव्यासाठी प्रत्येकी 49 हजार रुपये आकारले जातील, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. मुलांची विलगीकरण कक्षात राहण्याची तयारी आहे पण हा कक्ष दिल्लीऐवजी मुंबईत असावा, अशी सर्वांची मागणी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या संकटामुळे सर्वच पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून, या काळात एक लाखांचा खर्च करणे अवघड होऊन बसल्याचे पंड्या यांनी नमूद केले. पालक विशेषतः या मुलांची आई कमालीच्या मानसिक स्थितीतून जात आहेत, कौटुंबिक निराशा व सततची काळजी या मुळे अनेकांच्या तब्येतीवर याचा परिणाम होऊ लागला असून, याबाबत तातडीने या मुलांना भारतात परतण्यासाठी अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घ्यावा अशी पालकांची मागणी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा