पालक म्हणतायेत, ''दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत घाई कशाला?''

Parents  asking that Why so hurry for 10th and 12th standard exams.jpg
Parents asking that Why so hurry for 10th and 12th standard exams.jpg

पुणे :"मुलांना परीक्षेसाठी शाळेत पाठविले आणि त्यांना काही झाले, तर...! त्याला जबाबदारी कोण असेल? कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही परीक्षा घेण्याचा अट्टहास कशाला?, हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालणार आहे.'', अशा शब्दांत पालक आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नियमित वेळापत्रकानुसार होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे 1 ते 15 जुलै दरम्यान दहावी-बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा होणार आहेत. परंतु केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि सीबीएसईच्या या निर्णयावर पालक वर्गातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"जुलैपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणारी लस येणार आहे का?, आमच्या मुलांना परीक्षा केंद्रावर पाठविल्यानंतर त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण?, अशा तीव्र प्रतिक्रिया पालक व्यक्त करत आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकृत ट्‌विटर हॅडला टॅग करून अनेक पालक या निर्णयाचा खरपुस समाचारी घेत आहेत.

कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...

 पालकांचे म्हणणे :
- मुलांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेची शाश्‍वती कोण देणार?
- परीक्षेला अन्य पर्याय शोधणे आवश्‍यक 
- कोरोनाचा संसर्ग अद्याप आटोक्‍यात नसताना; परीक्षा घेण्यची घाई कशाला
- अन्य राज्य मंडळाप्रमाणे परीक्षा रद्द करणे अपेक्षित होते

पुणेकरांनो कोरोनाच्या उपचाराच्या खर्चाची चिंता सोडा; ही बातमी वाचा!

"कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणारी लस विकसित होत नाही, तोपर्यंत केंद्र सरकारने परीक्षेसंदर्भातील निर्णय जाहीर करायला नको होते. परीक्षेमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे जीव धोक्‍यात येणार आहे. मुलांना काही झाल्यास ती जबाबदारी सरकारची राहील. या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थी तणावात आले आहेत. सरकारने परीक्षेपेक्षा मुलांच्या जीवनाला अधिक महत्त्व देणे गरजेचे होते.''
- अनुभा सहाय, अध्यक्ष, इंडिया वाइड पॅरेंटस्‌ असोसिएशन

पुण्यात पाणी होतय शुध्द; गोंगाटही कमी झाला

"कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असून अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. अशात परीक्षा होणार, असल्याचे जाहीर केल्याने पालक आणि विद्यार्थी धास्तावले आहेत. सीबीएसईने सरासरी गुण देणे किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याचा पर्याय स्वीकारायला हवा होता. एखादी परीक्षा म्हटलं की संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. त्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांची नाही म्हटले तरीही परीक्षा केंद्राबाहेर गर्दी होणार आहे. त्यामुळे परीक्षा घेणे कितपत सुरक्षित आहेत, याबद्दल शंका उपस्थित होत आहे.''
- सुनील चौधरी, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com