पुणे : बिबवेवाडीतील क्लाइन मेमोरियल स्कुल मध्ये बाऊन्सरकडून पालकांना मारहाण

राज्य सरकारच्या आदेशानुसार 15 टक्के फी वाढ कमी करण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळेतील महिला बाऊन्सर ने धक्काबुक्की करत काठीने मारहाण करण्याचा प्रकार घडला.
पुणे : बिबवेवाडीतील क्लाइन मेमोरियल स्कुल मध्ये बाऊन्सरकडून पालकांना मारहाण
Summary

राज्य सरकारच्या आदेशानुसार 15 टक्के फी वाढ कमी करण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळेतील महिला बाऊन्सर ने धक्काबुक्की करत काठीने मारहाण करण्याचा प्रकार घडला.

बिबवेवाडी - राज्य सरकारच्या आदेशानुसार 15 टक्के फी वाढ कमी करण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या पालकांना (Parents) शाळेतील महिला बाऊन्सर (Women Bouncer) ने धक्काबुक्की करत काठीने मारहाण (Beating) करण्याचा प्रकार बिबवेवाडीतील कलाईन मेमोरियल स्कुल मध्ये घडला याबाबत पालक मयुरेश गायकवाड यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार (Complaint) केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सोशल मीडियावर वृत्त व्हायरल झाल्यावर अनेक पालक व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते शाळेत येऊन मुख्यध्यापिकाना घेराव घातला यावेळी मारहाण झालेले पालक व कार्यकर्त्यांनी संबंधित सुरक्षा व्यवस्था व शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलन केले.

कोरोना काळात शाळा सुरु नसताना विद्यार्थ्यांकडून फी वसूल करण्यात आली, काही पालकांची परिस्थिती नसतांना त्यांना फी भरावी लागली, संबंधित फी 15 टक्क्यांनी कमी करण्यासाठी राज्य शासनाने आदेश काढले असून संबंधित शाळा प्रशासन राज्य सरकारच्या आदेशानुसार फी माफ करत नसल्याने त्या संबंधि निवेदन देण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळेच्या सुरक्षा रक्षक महिला बाऊन्सर ने धकबुक्की करत काठीने मारहाण केली. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा सिंग यांनी संबंधित घटना घडतेवेळी पालकांनी महिला बाऊन्सर ला हात लावल्यामुळे संबंधित महिलेने हात उचलला असल्याचे सांगितले.

तक्रारदार मयुरेश गायकवाड यांनी आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो परंतु महिला बाऊन्सर ने आम्हाला आत जाऊ न देता धक्काबुक्की करत मारहाण केल्याचे सांगितले याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांनी संबंधित सुरक्षा यंत्रणा व शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विधिमंडळात 15 टक्के फी माफी संदर्भात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.

प्रशासकिय अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी संबंधित शाळेबाबत 12 ऑगस्ट 2021 च्या आदेशानुसार 15 टक्के फी माफ करण्याचे सांगितले आहे परंतु शाळा आदेश पाळत नसेल तर शाळेला शासनाने दिलेली मान्यता रद्द करण्याबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी सांगितले पालकांच्या तक्रारी नुसार कलम 323 व 504 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, फी वाढी संदर्भात संबंधितांची तक्रार असून तक्रादार व शाळा प्रशासन निर्णय घेतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com