'तू हे करु नको' सांगण्यापेक्षा 'हे केल्याने तुझे काय नुकसान होऊ शकते' हे सांगावे...

ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टतर्फे संयम लघूपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले
Parents can keep children away from addiction detoxification experts pune
Parents can keep children away from addiction detoxification experts pune sakal

पुणे : पाल्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी आपापल्या पाल्यांशी पालक होऊन नव्हे तर, त्याचा नैसर्गिक मित्र होऊन त्याला चांगले व वाईट यातील फरक दाखवून द्यावा लागेल, असे मत व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी बुधवारी (ता.१६) एका परिसंवादात बोलताना व्यक्त केले.

प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या पाल्याला 'तू हे करु नको' असे सांगण्यापेक्षा 'हे केल्याने तुझे काय नुकसान होऊ शकते' याची जाणीव त्यास करुन दिली तर, कोणताही पाल्य व्यसनांची वाट चोखळणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टतर्फे संयम लघूपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'आधुनिक जगातील बहुरुपी शत्रू' या विषयावरील एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात प्रसिद्ध गीतकार,गायक आणि संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी, प्रसिद्ध कवी संदीप खरे, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर आदी सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणीकरण परिषदेचे (नॅक) अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन, ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टचे नंदकिशोऱ राठी,रतन राठी,राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, महोत्सवाचे परीक्षक नंदेश विठ्ठल उमप, संयम लघूपट महोत्सवाचे समन्वयक दर्शन मुंदडा, ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टच्या विश्वस्त श्रद्धा राठी, प्रकाश चाफळकर आदी उपस्थित होते.

आपल्याला तंत्रज्ञानाच्या व्यसनाबाबत अति तिथे माती या म्हणीचा आपल्याला प्रत्यय येतो आहे. आपण तंत्रज्ञान टाळू शकणार नाही. उलट दिवसेंदिवस त्याचा प्रभाव वाढतच जाणार आहे. त्यातले चांगले काय आणि वाईट काय हे, आपण आपल्या पाल्याला दाखवू शकलो पाहिजे. घरामध्ये भौतिक सुखसोयींची रेलचेल असतांना पुस्तकांचे एक कपाट आणि एक कोपरा आहे का, हेही आवर्जुन पाहिले पाहिजे. शेवटी तारतम्यता ठेवूनच तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, असे संदीप खरे यांनी यावेळी सांगितले.

स्वजाणीवेतून व्यसनमुक्तीचे पाऊल उचलले गेले पाहिजे. या जाणीवेतून व्यसनापासून दूर जाण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. व्यसनाधीनता हा सामाजिक प्रश्न म्हणून पुढे येत असून या प्रश्नाला भिडण्यासाठी समाजातून नेतृत्व उभे राहिले पाहिजे. चोर पावलांनी शिरलेले कोणतेही व्यसन तर्क संगतीच्या फुटपट्टीवर मोजले गेले पाहिजे. सर्वसामान्यपणे या विषयांचे आकर्षण पौगंडावस्थेत लागते. त्यामुळे समवयस्क मित्रांच्या 'पिअर ग्रुप'चा दबाव हा पालक आणि पाल्यातील संवादातून दूर करता आला पाहिजे, असे मत डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

संयम लघूपट महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे. याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. धुम्रपान,ड्रग, मद्यपान, मोबाईल आणि समाज माध्यमे या व्यसनांची मांडणी करणारे वैविध्यपूर्ण लघूपट हे या महोत्सवाचे मुख्य विषय होते. यामध्ये अगदी ११ वर्षांपासून ६९ वर्षे वयापर्यंतच्या सर्व स्तरातील व्यक्तींनी प्रभावीपणे विषयांची मांडणी करत सहभाग नोंदवला. यासाठी चित्रपटांच्या ९४ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यातून पुरस्कारांसाठी विविध वर्गवारीतून आठ विजेत्या चित्रपटांची निवड करण्यात आल्याचे नंदकिशोर राठी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com