Motivational News : हिम्मत असणारे पालक मुलांना सैन्यात पाठवितात

मुलांना सैन्य दलात पाठविण्यासाठी हिम्मत लागते. ज्या आई वडीलांमध्ये हिम्मत असते तेच मुलांना सैन्यदलात पाठवू शकतात.
Siddhesh Khalade and Viraj Jagtap
Siddhesh Khalade and Viraj Jagtapsakal
Summary

मुलांना सैन्य दलात पाठविण्यासाठी हिम्मत लागते. ज्या आई वडीलांमध्ये हिम्मत असते तेच मुलांना सैन्यदलात पाठवू शकतात.

केडगाव, जि. पुणे - मुलांना सैन्य दलात पाठविण्यासाठी हिम्मत लागते. ज्या आई वडीलांमध्ये हिम्मत असते तेच मुलांना सैन्यदलात पाठवू शकतात. अशा आई-वडिलांना माझा सलाम आहे. मराठी मुलांनी सैन्यात भरती झाले पाहिजे. सैन्यात उत्तम करिअरबरोबर देशसेवा संधी मिळते असे मत शौर्य पदक विजेते कर्नल सचिन रंधाळे यांनी व्यक्त केले आहे.

देलवडी (ता. दौंड) येथील सिद्धेश दीपक खळदे व आंबळे (ता. पुरंदर) येथील विराज राजेंद्र जगताप यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील (एनडीए) तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण नुकतेच पुर्ण केले. त्याबद्दल त्यांचा अखिल भारतीय पुर्व सैनिक सेवा परिषद व भिमथडी सैनिक संघ यांनी पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी रंधाळे बोलत होते. विराजचे आजोळ खोपोडी (ता. दौंड) आहे.

यावेळी कर्नल नरेश गोयल, सैनिक संघाचे अध्यक्ष दशरथ ताकवणे, सयाजी ताकवणे, पोपटराव ताकवणे, सर्जेराव जेधे, सरपंच जयश्री ताकवणे, प्राचार्य शहाजी हिरडे, विजय काळे, संभाजी ताकवणे, अतुल ताकवणे, रा. वि. शिशुपाल आदी उपस्थित होते. दौंड तालुका पत्रकार संघाच्यावतीने सिद्धेश व विराज यांचा सत्कार करण्यात आला.

कर्नल नरेश गोयल म्हणाले, आताची मुले भाग्यशाली आहेत. त्यांच्याकडे संगणक, गुगल, इंटरनेट आहे. तरीही केवळ साधने यश देत नाही तर त्यासाठी संकल्प, जिद्द, मेहनत गरजेची आहे.

सिद्धेश खळदे, विराज जगताप म्हणाले, औरंगाबाद येथे एसपीआय संस्थेत भरती पुर्व प्रशिक्षण घेता येते. ज्यांना सैन्यात अधिकारी व्हायचे आहे त्यांनी एसपीआयमध्ये प्रवेश घ्यावा. एनडीएमध्ये तिन्ही दलाचे एकत्रितपणे प्रशिक्षण घेता येते. बारावीनंतर ही परीक्षा देता येते. सैन्यदलाची करिअर करण्याची आवड असेल तर पदवी पर्यंत अनेक संधी आहेत. त्यावर लक्ष ठेवा. सैन्यदलात देशाची सेवा करण्याची संधी आहे. सैन्यदलातील जीवन आव्हानात्मक आहे. स्पष्ट ध्येय व मेहनत करण्याची तयारी असेल तर यश मिळते.

सुभेदार मेजर दीपक शेळके, सुभेदार हंबीरराव जेधे, वारंट ऑफिसर रमेश वाघमोडे, रवी ताकवणे, शहाजी ताकवणे या सैनिकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सुभेदार मेजर दीपक शेळके यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन सुनील ताकवणे यांनी केले तर सुभेदार हंबीरराव जेधे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com