लहान मुलांच्या करमणुकीसाठी पालकांनीच घ्यावी काळजी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापेक्षाही अधिक काळापासून लहान मुले घरातच आहेत. त्यामुळे आता तर ऑनलाइन शाळेलाही सुटी आहे.
Child
ChildSakal

पुणे - आकाशात उंच-उंच उडणारे विमान, (Aeroplane) आकाशाला छेदून जाणारी रॉकेट (Rocket) याची आवड असणारा अवघ्या पाच वर्षांचा राघव सध्या घरातील टाकाऊ पुठ्ठ्यांपासून रॉकेट बनविण्यात गुंतलाय. तर रंगांमध्ये (Colour) रमायला आवडणाऱ्या ओजसने ‘वॉल पेटिंग’ (Wall Painting) सुरू केलंय. मुलांच्या कल्पकतेला वाव मिळाला की ते मनातील कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात, हे या दोघांच्या अनुभवातून दिसून येते. (Parents should take care of their childrens entertainment)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापेक्षाही अधिक काळापासून लहान मुले घरातच आहेत. त्यामुळे आता तर ऑनलाइन शाळेलाही सुटी आहे. त्यामुळे ‘दिवसभर मुलांना घरातच कसे रमवायचे’ असा प्रश्न पडला असेल, तर मुलांच्या कल्पकतेला, नावीन्यतेला, छंद जोपासण्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलांमध्ये (मुलगी/मुलगा) कल्पकता असते. मुलांच्या आवडीचा कल जाणून त्यांना ती आवड जोपासण्यासाठी मदत करायला हवी. जेणेकरून घराबाहेर पडता येत नसल्यामुळे निराश होणारी मुले घरात रमतील, असे गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

कोरोनामुळे गेल्या वर्षभराहून अधिक काळ मुले घरात आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांना खूप दडपणाखाली आल्यासारखे किंवा कंटाळवाणे वाटू शकते. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त मोकळीक द्यायला हवी. मुलांच्या कल्पकतेला वाव दिला पाहिजे. त्याचा शोध घेण्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी कंटाळवाणे नसावे. स्वत: नेहमी ताजेतवाने असावे, म्हणून मुलांनीही सकारात्मक ऊर्जा मिळेल.

- शोभा भागवत, गरवारे बालभवन, संचालिका

Child
पुणे महापालिकेच्या आधीच खासगी रुग्णालयांना मिळणार लस?

पालकांनी हे करावे

  • मुलांच्या कल्पकतेला वाव द्यावा

  • दिवसातील काही वेळ मुलांबरोबर घालवा

  • भरपूर खेळू द्या

  • वयानुसार ‘मोटार स्किल्स’ विकसित होण्यावर भर द्या

  • घरातच खेळता येतील, असे धम्माल खेळ शिकवा आणि त्यांच्यासमवेत खेळा

  • मुलांची आवड ओळखून, त्यात अधिक रस वाटेल, यासाठी पुढाकार घेणे

हे करू नये

  • मुलांची इच्छा नसताना त्यांना कोणतीही गोष्ट करायला लावणे

  • संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक बनवून, त्याप्रमाणेच काटेकोरपणे वागण्याचे बंधन

  • मुलांवर सतत ओरडणे, वैतागणे, चिडचिड करणे

  • मुलांची इतर मुलांशी तुलना करणे

  • सतत कंटाळा येईल, असे वागणे

Child
तिसऱ्या लाटेचा विचार करुन नियोजन करा : अजित पवारांच्या सूचना

मुले घरात रमण्यासाठी...

कलाकृती

कागद, कापड, टाकाऊ वस्तू, पान, फुले यांपासून कलाकृती बनवायला शिकवा. चित्र काढायला किंवा रंगकाम आवडत असल्यास संधी उपलब्ध करून द्या.

गार्डनिंग

घरात छोटीशी बाग फुलवायला सांगा. झाड लावणे, खत-पाणी घालणे.

वाचन

आवडीनुसार छोटी-छोटी पुस्तके वाचायला देणे, शब्दसंग्रह वाढविणारी कोडी

घरगुती खेळ

सापशिडी, कॅरम, टेबल टेनिस

फिटनेस

व्यायामाची सवय आणि आवड निर्माण करण्यासाठी विविध व्यायाम प्रकार

छंद जोपासणे

मुलांना एखादा छंद असल्यास तो जोपासण्यासाठी मदत करा, प्रोत्साहन द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com