

Horse killed in a midnight leopard attack in Pargaon, Daund.
Sakal
प्रकाश शेलार
खुटबाव : पारगाव (ता. दौंड )येथे पॉवर हाऊस शेजारील गट क्रमांक १८३० मधील एका शेतकऱ्याच्या पडीक शेतीमध्ये पाल ठोकणाऱ्या खोर येथील मेंढपाळाच्या घोड्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ५० हजार रुपये किंमतीचा लाल रंगाचा घोडा जागीच मृत्युमुखी पडला. सदर घटना सोमवार दिनांक १७ रोजी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली.