Accident : टेम्पोचा अपघात! धक्कादायक माहिती आली समोर

रांजणगाव-ओझर अष्टविनायक महामार्गावर अपघात होऊन एका बाजूला पलटी झालेल्या टेम्पोची घटनास्थळी जाऊन पोलिसांनी केली पाहाणी.
Cow Calf
Cow CalfSakal

पारगाव - पोंदेवाडी, ता. आंबेगाव गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर अपघात होऊन एका बाजूला पलटी झालेल्या टेम्पोची घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहाणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला असून, टेम्पोत जर्सी गाईंची जिवंत 10 गोऱ्हे (लहान वासरे ) कत्तली साठी नेण्याच्या इराद्याने रस्सीच्या साहयाने करकचुन बांधलेली आढळून आली.

अपघातानंतर वासरे जागेवरच सोडून टेम्पो चालक फरारी झाला आहे. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारगाव पोलिसांनी सर्व लहान वासरे पाबळ( ता. शिरूर) येथील गोशाळेत पाठवली आहे.

पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवार सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली कि पोंदेवाडी गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर पूजा हॉटेलच्या जवळ एक टेम्पोचा अपघात झाला असून, टेम्पो एका बाजूला कलंडलेला आहे टेम्पो जवळ कोणीच नाही.

पारगाव कारखाना पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता अपघातानंतर चालक टेम्पो जागेवरच सोडून फरार झाला तर टेम्पो क्रमांक एम.एच.14 एफ. 8356 मध्ये सुमारे 20 हजार रुपये किंमतीचे काळे, पांढरे, तांबडे रंगाची शिंगे नसलेली लहान जर्सी गाईंची 10 गोऱ्हे ( लहान वासरे) सर्वांची वय अंदाजे 10 दिवस या जनावरांना रस्सीच्या साहयाने करकचुन बांधुन त्यांना कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची सोय न करता कत्तलीसाठी घेवुन जात असताना बेदरकार पणे गाडी चालविल्याने अपघात झाला असुन, अपघातामध्ये स्वतः जखमी होणेस व पिकअप गाडीचे किरकोळ नुकसान होणेस कारणीभुत झाला आहे.

तसेच सदर वासरांचे पशु वैदयकिय अधिकारी यांचे फिटनेस प्रमाणपत्र,जनवारे वाहतुक करण्याचा परवाना नसल्याबाबत दिसुन आला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता सदर टेम्पोचा चालक निलेश नायलिंग काळे (रा. अवसरी, ता.आंबेगाव) हा चालक असल्याची माहिती समजली पोलीस काँन्टेबल राजेश गोविंद उतळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि.कलम 279,337,427 प्रांण्याचा छळ प्रतिंबधक कायदा कलम 11(1)(ड),11(1)(ई),11(1), महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5(अ) व कलम 5(ब) व मोटार वाहन कायदा कलम 83,177 प्रमाणे गुन्हा दाखल करून सर्व जनावरे पाबळ येथील गोशाळेत जमा केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com