Accident : मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक; अपघातात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू

पारगाव ते शिरूर रस्त्यावरील रोडेवाडीफाट्याजवळ मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू.
accident
accidentesakal

पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) ते शिरूर रस्त्यावरील पोंदेवाडी गावाच्या हद्दीत रोडेवाडीफाट्याजवळ काल बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील संदिप बाळू केदारी (वय-28वर्षे) रा. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर व कैलास तुकाराम पारधी (वय-28 वर्षे) रा. वेताळे, ता. खेड या दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव ते शिरूर रस्त्यावरील पोंदेवाडी गावाच्या हद्दीत रोडेवाडी फाट्याजवळ आनंद हॉटेलच्या समोर काल बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संदिप बाळू केदारी व त्याचा मित्र कैलास तुकाराम पारधी हे त्यांचे ताब्यातील हिरो कंपनीची मोटार सायकल नं. एम. एच. 14 एच. जे. 9335 हिच्या वरून नारायणगाव येथुन शिक्रापुर येथे जात असताना, रोडेवाडीफाटा बाजूकडून पारगाव बाजुकडे जाणारे अज्ञात वाहना वरिल अज्ञात चालक याने त्याचे ताब्यातील वाहन हे हयगईने अविचाराणे रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे, भरधाव वेगात चालवुन नारायणगाव बाजूकडून शिक्रापुर बाजुकडे जाणारी मोटार सायकल नं. एम. एच. 14 एच. जे. 9335 हिस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील संदिप बाळू केदारी व त्याचा मित्र कैलास तुकाराम पारधी यांना गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहन चालक अपघातात कुठलीही मदत न करता व खबर न देता तेथुन पळुन गेला आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com