पुणेकरांनो, उद्याने खुली होणार पण...; महापालिका आयुक्तांचा आदेश वाचाच

Garden
Garden

पुणे - नागरिकांवर कठोर बंधने लादत, येत्या रविवारपासून (ता.1) विविध भागांतील 81 सर्व उद्याने खुली करण्यात येणार आहेत. ती रोज सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत सुरू राहतील. मात्र, उद्यानांत योगा, हास्य क्‍लब, दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांसह नागरिकांना चालणे किंवा धावता येणार नाही, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच, व्यायामाचे साहित्य, खेळणी आणि हिरवळीवर बाकडांचा वापर करू नये, अशी सूचनाही केली आहे. उर्वरित 110 उद्याने पुढच्या टप्प्यांत सुरू होतील. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा उपाय म्हणून गेल्या सात महिन्यांपासून उद्याने बंद आहेत. महापालिका आयुक्त कुमार आणि उद्यान खात्याचे प्रमुख अशोक घोरपडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर खबरदारीच्या उपाय आखून सर्व उद्याने सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर मोहोळ यांनी केली. त्यानुसार सर्व म्हणजे, 191 उद्याने उघडली जाण्याची आशा होती. प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यांत विविध केवळ 81 उद्याने खुली करण्याचा आदेश आयुक्तांनी काढला आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवनागी मागू नये, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास उद्याने बंद करण्यात येतील, असेही कुमार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, उद्यानांची नियमित देखभाल केली जाते. मात्र, आता नव्याने ती सुरू करण्यात येत असल्याने आवश्‍यक ती कामे केल्याचे महापालिकेच्या उद्यान खात्याचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी सांगितले. 

नागरिकांसाठी बंधने 

  • सकाळी 6 ते 8 आणि सायं. 5 ते 7वेळेत उद्याने सुरू 
  • दहा वर्षापेक्षा कमी आणि 65 पेक्षा अधिक व्यक्तींना उद्यानात प्रवेश नाही 
  • गर्भवती महिला, अन्य आजार असलेल्यांना प्रवेश नाही 
  • हास्या क्‍लब, योगा, दिवाळी पहाट, एकत्रित बसणे, चालणे, धावण्यास बंदी 
  • मास्क बंधनकारक 
  • पान, तंबाखू खाणे आणि थुंकण्यास मनाई 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com