नो-पार्किंगमध्येच पार्किंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

वारजे - नो-पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने उचलण्याची यंत्रणा नाही, की कारवाईत उचललेली वाहने ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. अशी स्थिती वारजे वाहतूक पोलिसांची झाली आहे. त्यामुळे "नो-पार्किंग'चे फलक लावलेल्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पार्किंग केली जात आहे. वाहतूक पोलिसांकडे वाहने उचलण्यासाठी टेम्पोच नसतील, तर कारवाई कशी होणार आणि कोंडी कशी सुटणार, असा प्रश्‍न वारजेकर उपस्थित करीत आहेत.

या संदर्भात वारजे वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका होऊनही यातून अद्याप मार्ग निघाला नाही. कोणीही कोठेही वाहन पार्किंग करत असल्याने रस्ता तीनपदरी असला तरी प्रत्यक्षात एकच भाग वाहनचालकांना वापरता येत आहे. कर्वेनगर ते वारजे उड्डाण पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी दुकाने असल्याने नो-पार्किंगचे फलक असूनही लोक वाहने लावत आहेत.
गणपती माथा ते वारजे उड्डाण पूल हा रस्ता मुळातच अरुंद आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात. त्यामुळे सकाळ- सायंकाळ येथे मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. नो-पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई केली; तरच येथील वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल; पण त्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम झाली पाहिजे. त्यासाठीच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वारजे वाहतूक विभागाला नुकताच बदली होऊन आलो आहे. मात्र, थोड्याच दिवसांत वारजे- कर्वेनगर मध्ये 12 ठिकाणी पी- वन आणि पी-टू अशी पार्किंगव्यवस्था करण्यात येईल.
- सुनील पाटील, वाहतूक पोलिस निरीक्षक

हे आवश्‍यक...

  • - नागरिकांचे सहकार्य
  • - वाहने उचलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
  • - स्वतंत्र वाहतूक पोलिस नेमावेत
  • - नो-पार्किंगमधील वाहने ठेवण्यासाठी जागा
Web Title: Parking in No Parking