पुणे जिल्हा न्यायालयातील पार्किंग होणार सुटसुटीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

पुणे जिल्हा न्यायालयात गेल्यानंतर वाहन पार्क करण्यासाठी वकिलांना करावी लागणारी शोधाशोध आता थांबणार आहे. न्यायालयाच्या आतील पार्किंगचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे बार असोसिएशनने (पीबीए) तीन कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. तसेच वकील आणि न्यायालयातील कर्मचा-यांना वाहनांसाठी स्टिकर देण्यात येणार आहे.

पुणे - जिल्हा न्यायालयात गेल्यानंतर वाहन पार्क करण्यासाठी वकिलांना करावी लागणारी शोधाशोध आता थांबणार आहे. न्यायालयाच्या आतील पार्किंगचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे बार असोसिएशनने (पीबीए) तीन कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. तसेच वकील आणि न्यायालयातील कर्मचा-यांना वाहनांसाठी स्टिकर देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टीकर असलेल्या वाहनांनाच न्यायालयात प्रवेश मिळणार असल्याने पार्किंगसाठी येणा-या वाहनांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे आतील कोंडी कमी होईल. तर वाहन पार्किंगचे व्यवस्थापन करण्यासाठी तीन कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे. याबाबत पीबीएचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले की, न्यायालयात विनाकारण होणारी कोंडी टाळण्यासाठी काही वाहनांवर बंधन व नियंत्रण ठेवणे आवश्‍यक होते. त्यामुळे वकील आणि कर्मचा-यांच्या वाहनांसाठी पार्किंगचे स्टिकर्स देणे त्याची नोंद ठेवण्यात येईल. संबंधितांना स्टिकरचे वाटप करण्यासाठी त्याच्या नोंदीचे एक रजिस्टर केले आहे. ज्या वकिलांना पार्किंगचे स्टिकर घ्यायचे आहे त्यांनी वकील असल्याची खातरजमा करून तसेच त्यांचे नाव, सनद नंबर व त्यांचा वाहनांच्या नंबरच्या नोंदी रजिस्टरमध्ये करावी. नोंदणी झाल्यानंतर वकिलांना स्टीकर देण्यात येईल. या सर्व प्रक्रियेसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी परवानगी दिली आहे.

Video : पुणे - सीरम इन्स्टिट्यूटमधील आग आटोक्यात; 5 जण सुखरुप बाहेर

पक्षकारांना बाहेरचा रस्ता
पार्किंग केवळ वकील आणि कर्मचा-यांपुरते मर्यादित केल्याने पक्षकारांना न्यायालयाच्या परिसरात वाहने लावावी लागणार आहे. मात्र गेटनंबर चारजवळ मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील पार्किंगची जागा कमी झाली आहे. त्यामुळे तीननंबर गेटसमोर असलेल्या जागेवरील पार्किंगचा ताण वाढणार आहे. गेटनंबर चार बाहेर दोन्ही बाजूने पार्किंग करण्यास परवानगी मिळण्याची मागणी पीबीएकडून शहर सुधारणा समितीकडे करण्यात आली आहे.

Fire In Serum Institute : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अग्नीतांडव; पाहा फोटो

वाहन पार्क करून जाण्याचे प्रकार थांबणार
न्यायालयात वाहन पार्क करण्यासाठी यापूर्वी कोणालाही मनाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे परिसरातील अनेक खासगी कार्यालयांचे कर्मचारी न्यायालयात त्यांचे वाहन लावत. आता मात्र हा प्रकार थांबणार आहे. नोंदणी असलेली वाहने न्यायालयात जाणार असल्याने आतील सुरक्षा देखील वाढणार आहे.

सीरममध्ये भीषण आग; कोविशिल्ड लसीचा प्लांट सुरक्षित आहे का?

सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीबरोबर 20 ते 25 जण न्यायालयात येतात. त्यामुळे पार्किंगची जागा व्यापली जाते व सुरक्षेचा प्रश्‍न देखील निर्माण होतो. न्यायालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने पार्किंगचा प्रश्‍न देखील आता पुन्हा डोकं वर काढू शकतो. त्यावर उपाययोजना म्हणून हे सर्व नियोजन करण्यात आले आहे.
- ऍड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पीबीए

- वाहन पार्किंगसाठी वकील व पक्षकारांना मिळणार स्टिकर
- पक्षकारांना न्यायालयाच्या बाहेर वाहने लावावी लागणार
- गेटनंबर चारच्या बाहेर दुहेरी पार्किंगचा प्रस्ताव
- न्यायालयातील सुरक्षा आणखी वाढणार
- आतील पार्किंग सुटसुटीत होणार

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking at Pune District Court will be convenient