

‘सीजेपी’चे प्रश्न
अधिवेशनात नाकारले
मुख्य प्रवक्ते सौरव दास यांचा दावा
नवी दिल्ली, ता. १६ (पीटीआय) : संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखालील युवा आंदोलनाशी संबंधित प्रश्नांचे तीन संच नाकारण्यात आले. नियमावलीचे कारण देऊन हे प्रश्न फेटाळण्यात आल्याचा दावा पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी रविवारी केला.
दास यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून याबाबत दावा केला आहे. द्रमुकचे लोकसभा खासदार माथेश्वरन व्ही. एस. यांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे तीन संचांद्वारे प्रश्न विचारले होते. यामध्ये नीट-यूजी २०२६ परीक्षेचे शुल्क परत करणे, दिल्लीतील आंदोलकांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सुविधा नाकारणे, आंदोलक विद्यार्थ्यांशी सरकारची चर्चा, विद्यार्थी कल्याण, पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा; तसेच शांततापूर्ण आंदोलनाच्या मूलभूत अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांना मिळणारी वागणूक यांबाबत माहिती विचारण्यात आली होती. मात्र, हे कायदेशीर प्रश्न फेटाळण्यासाठी अत्यंत विचित्र कारणे देण्यात आल्याचे दास यांनी म्हटले आहे. लोकसभा कामकाजाच्या नियम ४१ (२) मधील विविध कलमांचा आधार घेऊन हे प्रश्न नाकारण्यात आले. खासदार माथेश्वरन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, पोर्टलद्वारे आपल्याला ही माहिती मिळाल्याचे सांगितले.
कोट
जर हे प्रश्न संसदेत विचारले जाऊ शकत नाहीत, तर सरकारने उत्तर कोठे द्यायचे? आंदोलनांच्या काळात गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन पोलिस कारवाईबाबत उत्तरे का दिली नाहीत? खासदारांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे.
-सौरव दास, ‘सीजेपी’चे प्रवक्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.