Parth Pawar : पार्थ पवार यांच्यावर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश, तहसीलदाराचे निलंबन

Pune land case : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार अंबादास दानवे यांनी हे आरोप सार्वजनिक केले. १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना खरेदी केल्याचा आणि फक्त ₹५०० स्टॅम्प ड्युटी भरल्याचा आरोप आहे.
Parth Pawar : पार्थ पवार यांच्यावर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश, तहसीलदाराचे निलंबन
Updated on

Summary

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

  2. संबंधित तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात आले आहे.

  3. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्कमधील एका जमीन खरेदी प्रकरणात घोटाळ्याचे आरोप होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर आरोप केले आहेत. १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी करण्यात आल आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आल्याचे दानवे यांनी दावा केला आहे. दरम्यान हे प्रकरण चर्चेत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी निर्देश दिले असून तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचे निलंबन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com