parth pawar
parth pawar

मावळात पार्थ पवारांकडून भेटीगाठी सुरु; घेतला आढावा

पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून चर्चा सुरु असतानाच आज (मंगळवार) पार्थ पवार यांनी भेटीगाठी घेत आढावा घेतला.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आज त्यांनी मोरया गोसावी गणपतीची आरती केली. त्यानंतर शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, तरुण, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना भेटून आढावा घेतला.

दरम्यान त्यांनी काही कार्यकर्त्यांसह चहाचाही आस्वाद घेतला. लोकसभेसाठी अद्याप आघाडीची घोषणा झाली नसून, मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. याठिकाणी शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार असून, त्यांना लढत देण्यासाठी पवार कुटुंबातील सदस्य उतरणार हे जवळपास निश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com