Bodybuilding Competition : शरीर सौष्ठवमध्ये दिव्यांग व महिलांचा सहभाग अभिमानास्पद - रवींद्र धंगेकर

शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये आतापर्यंत पुरुषांना प्राधान्य दिले जात होते. मात्र, अलीकडे दिव्यांग आणि महिलांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.
Bodybuilding Competition
Bodybuilding Competitionsakal

कॅन्टोन्मेंट - शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये आतापर्यंत पुरुषांना प्राधान्य दिले जात होते. मात्र, अलीकडे दिव्यांग आणि महिलांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांचा मोठा सहभाग असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे मत आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे आयोजन आमदार रवींद्र धंगेकर आणि विनायक क्षीरसागर यांनी केले होते. याप्रसंगी डॉ. संजय मोरे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक अविनाश बागवे, राजेश सावंत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश ईरले, प्रकाश रेणुसे, राजेंद्रसिंग वालिया आदी उपस्थित होते. यावेळी संभाजीनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र श्री, भारत श्री, युनिव्हर्स श्री संघाची निवड कऱण्यात आली.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरद चव्हाण, अनिल शिंदे, इलियास शेख, किरण भिसे, योगेश कांबळे, कमलाकर वीरकर, जयसिंग भिंगारे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

वूमन्स क्लासिक श्री 2023- प्रथम- राणी काची व द्वितीय- कादंबरी सोनी यांना मान मिळाला.

ज्युनिअर पुणे श्री - 2023 -

  • 55 किलो वजनगट- प्रथम- सूरज थोरात, द्वितीय- विनायक कलरिकडी, तृतीय- अमृतकर.

  • 60 किलो- प्रथम- सागर ठाकूर, द्वितीय- प्रतिक पाटील, तृतीय- ओंकार भिसे.

  • 65 किलो- प्रथम- सौरभ माने, द्वितीय- अजित तावरे, तृतीय- प्रफुल्ल गायकवाड.

  • 70 किलो- प्रथम- अक्षय वाडीकर, द्वितीय- शुभम वीर, तृतीय- प्रतिक खांडभोर.

  • 75 किलो- प्रथम- शिवराम धुमाळ, तृतीय- अनुज यादव.

  • 80 किलो- प्रथम- चंद्रकांत तिवारी, द्वितीय- विशाल सुरवसे, तृतीय- अनिकेत बुरटे.

सीनिअर पुणे श्री-2023 -

  • 55 किलो- प्रथम- अविनाश नायडू, द्वितीय- रोहित गजमल, तृतीय विनायक कलरीकंडू.

  • 60 किलो- प्रथम- सिद्धेश गडगे, द्वितीय- विशाल मोहाळे, तृतीय- सागर ठाकूर.

  • 65 किलो- प्रथम- सचिन सावंत, द्वितीय- सौरभ माने, तृतीय- रमेश म्हाळुंगकर.

  • 70 किलो- प्रथम- अक्षय वाडेकर, द्वितीय- योगेश मेंगडे, तृतीय- रोहित चौगुले.

  • 75 किलो- प्रथम- प्रशांत इंगळे, द्वितीय- शिवराम धुमाळ, तृतीय- विश्वनाथ ढोणे.

  • 80 किलो- प्रथम- महेंद्र पाचपुते, द्वितीय- मयुरेश मोरे, तृतीय- शुभम पिंगळे.

  • 80 किलोवरील- प्रथम- मिथुन ठाकूर, द्वितीय- मोहम्मद ऐराज, तृतीय- जुनेद खान.

मास्टर श्री-2023 - प्रथम- हरजितसिंग, द्वितीय- विश्वनाथ ढोले, तृतीय- दीपक पाटील.

मेन्स फिजिक श्री-2023 (165 सेंमीवरील) प्रथम- प्रशांत इंगळे, द्वितीय- विराज गुप्ता, तृतीय- परिक्षित भालेराव.

मेन्स फिजिक श्री-2023 (165 सेमीखालील)- प्रथम- शिवराम धुमाळ, द्वितीय- विनोद पवार, तृतीय- अमित कोल्हे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com