पारवडीच्या भैरवनाथाची रविवारी यात्रा

संतोष आटोळे 
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यासह संपूर्ण पंचक्रोशीत एक जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द असलेल्या पारवडी येथील भैरवनाथाची यात्रा रविवारी (ता.08) व सोमवारी (ता.09) संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती गावचे मार्गदर्शक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी दिली.

यात्रा कालावधीत मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असुन भक्तांच्या साठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये यात्रेच्या पहिल्या दिवशी रविवार (ता.08) रोजी पहाटे देवाचा मुखवटा आंघोळीसाठी भिगवण येथे भिमानदी किनारी नेण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी सात वाजता वाजत गाजत मिरवणुक काढीत दहा वाजता मंदिरामध्ये अभिषेक करण्यात येणार आहे. त्याच कालखंडापासुन देव दर्शन सुरु होणार आहे. तर संध्याकाळी मानाचे छबिने कटफळ गावासह पारवडीच्या देवांचे गाव प्रदक्षिणेसाठी वाजत गाजत काढण्यात येणार आहे. संध्याकाळी भाविक भक्तांच्या मनोरंजनासाठी आनंद जळगावकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.

तर सोमवारी (ता.09) रोजी पहाटे पालखी मंदिरात नेणे व भाकनुकीचा कार्यक्रम, त्यानंतर तमाशाचा हजेरी कार्यक्रम, दुपारी कुस्त्यांचा भव्य आखाडा, व शेवटी गावचा मानपान सुपारीच्या कार्यक्रमाने गावच्या यात्रेची सांगता होणार आहे. दरम्यान यात्रा कालावधीत गावातील रस्ते, दिवाबत्ती, पाणा पुरवठ्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती गावचे सरपंच जिजाबा गावडे व यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.

Web Title: parwadi bhairawnath yatra celebration at parwadi pune