
Pashan Traffic
Sakal
पाषाण : पाषाण-सूस रस्त्यावरील शिवशक्ती चौकात रविवारी भरविण्यात येणाऱ्या शेतकरी आठवडे बाजारामुळे परिसरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारात येणारे ग्राहक आपली वाहने थेट रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापला जात असल्याने वाहनांसाठी रस्ता अरुंद होते. त्यामुळे उद्भवणाऱ्या कोंडीचा शाळा, कार्यालये व दैनंदिन कामांवर होत आहे.