पीएमपीच्या अवेळीपणामुळे पुणेकर हैराण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुणे : पीएमपी बस वेळेवर येत नसल्यामुळे धनकवडी, तळजाई पठार, सहकारनगर, पद्मावती, सारंग, लक्ष्मीनगर या भागातील नागरिकांना तासन्‌तास थांब्यावर ताटकळत थांबावे लागत आहे. वीस ते पंचवीस मिनिटांनी एक बस असे वेळापत्रक असतानाही एकही बस वेळेत येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

बस वेळेत येत नसल्याने रिक्षा, दुचाकी वाहनांचा वापर करावा लागत आहे. विद्यार्थिनी सोनाली जगताप म्हणाली, " धनकवडी (तळजाई पठार) वरून बस क्रमांक 31 व 33 येत असते. पूर्वी ही बस पद्मावती येथून जात होती; मात्र सध्या ती धनकवडीवरून येत असल्याने बस भरलेली असते. यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यास जागा मिळत नाही. बससेवा सुरळीत करावी.'' पीएमपी प्रवासी मंचाचे पदाधिकारी संजय शितोळे म्हणाले, " संपूर्ण शहरात पीएमपी प्रशासनाचा कारभार गोंधळात सुरू आहे. यामुळे रिक्षा, दुचाकींचा आधार घ्यावा लागत आहे. पीएमपी प्रशासनाने बससेवा सुरळीत सुरू करावी आणि प्रवाशांची गैरसोय टाळावी.''
कात्रज डेपोचे व्यवस्थापक विक्रांत शितोळे म्हणाले, '' धनकवडी (तळजाई पठार) वरून क्र. 31 (धनकवडी तळजाई पठार ते पुणे रेल्वे स्थानक) व क्र. 33 धनकवडी ते शिवाजीनगर या बस पद्मावती, सहकारनगर या भागातून स्वारगेटवरून पुणे रेल्वे स्थानक व शिवाजीनगरकडे जात असून, प्रत्येक 20 ते 40 मिनिटांनी बस आहेत. सकाळच्या वेळी चार गाड्या व दुपारच्या वेळी तीन आणि एक ब्रोकर गाडी गर्दी व प्रवाशांच्या गरजेनुसार सोडत असतो.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger annoyance due to PMP mismanagement