रिक्षाचालकाकडून प्रवाशाला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

रस्त्यात रिक्षा थांबविल्याबाबत प्रवाशाने विचारणा केल्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केली. ही घटना मोशी येथे घडली.

पिंपरी - रस्त्यात रिक्षा थांबविल्याबाबत प्रवाशाने विचारणा केल्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केली. ही घटना मोशी येथे घडली. 

नारायण भाऊराव चावरे असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यानुसार रिक्षाचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (ता.5) रात्री अकरा वाजता चावरे हे (एम.एच. 14, जीसी. 3519) क्रमांकाच्या रिक्षाने प्रवास करीत होते.

पुणे-नाशिक मार्गावरील आदर्शनगर येथील पीएमपी बसथांब्याजवळ चालकाने रिक्षा थांबविली. दरम्यान, चावरे यांना पुढे पोहोचण्यास उशीर होत असल्याने त्यांनी रिक्षाचालकाला रिक्षा का थांबविली याबाबत विचारणा करीत लवकर निघण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना लोखंडी हत्याराने बेदम मारहाण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passenger beating by rickshaw driver crime