चीनमधील वुहान शहरातून येणारा प्रवासी विलगीकरण कक्षात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

पुण्यातील संशयित रुग्ण
  १८ जानेवारीपासून दाखल झालेले संशयित रुग्ण - ९
  रुग्णालयातून घरी सोडलेल्या संशयित रुग्णांची संख्या - ५
  सध्या रुग्णालयात दाखल संशयित रुग्ण - ४

पुणे महापालिका करणार जनजागृती
कोरोना विषाणूंबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज व्हायरल होत आहेत. नागरिकांमध्ये या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिका सार्वजानिक ठिकाणी पन्नास हजार पोस्टर लावून या आजाराबाबत जनजागृती करणार आहे. या पोस्टरवर कोरोनाची लक्षणे, त्यासंबधी घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती देण्यात येणार असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली.

पुणे - कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा उद्रेक झालेल्या चीनमधील वुहान शहरातून येणाऱ्या प्रवाशाला तसेच, गेल्या दोन आठवड्यांत प्रवास करून परतलेल्या प्रवाशाला विलगीकरण कक्षात दाखल करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य खात्याने घेतला आहे. तसेच त्यांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविणार असल्याचेही निश्‍चित झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वुहान शहरातून येणाऱ्या प्रवाशांपुरताच हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आता चीन, हाँगकॉगपाठोपाठ थायलंड आणि मलेशियाहून थेट भारतात येणारे विमानातील आंतरराष्ट्रीय प्रवासीदेखील तपासण्यास सुरवात केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी तपासणीचे काम वाढल्याने मुंबई विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीला राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १० वैद्यकीय अधिकारी आणि १५ आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. 

कात्रज दूध दरवाढ या दिवसापासून येणार अमलात

कोरोनाचा उद्रेक झालेल्या भागातून १५ जानेवारी किंवा त्यानंतर येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा आता १४ दिवसांपर्यंत करण्यात येणार आहे. यापूर्वी तो २८ दिवस करण्यात येत होता. मात्र, या काळात त्यांना कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्याच्या सूचनाही दिली आहे.

पुणे : ट्रेझरी पार्क सोसायटीसमोर तरुणावर धारदार शस्त्रांनी वार
 
आठ हजार ८७८ जणांची तपासणी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ फेब्रुवारीपर्यंत आठ हजार ८७८ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच, क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही कोरोनाबाधित भागातून प्रवास करून आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत बाधित भागातून १०४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १८ जानेवारीपासून २१ जणांना ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केले होते.

त्यापैकी ११ जणांचे प्रयोगशाळा नमुने ‘निगेटिव्ह’ आले आहेत. उरलेल्या तिघांचे प्रयोगशाळेतील अहवाल अद्याप मिळाले नाहीत. रुग्णालयात दाखल केलेल्या २१ पैकी १५ जणांना घरी सोडले असून, सध्या मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात एक व पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात चार, मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात एक रुग्ण दाखल असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the passenger detachment room coming from Wuhan China