मंचर बस स्थानकात प्रवाशांचे हाल

मंचर बस स्थानकात प्रवाशांचे हाल

मंचर : ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाने जादा एसटी गाड्या सोडणे अपेक्षित आहे. पण मंचर बसस्थानकाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रांजणी, लाखणगाव व महाळुंगे पडवळ या तीन गावी मुक्कामी जाणाऱ्या तीन एसटी गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून दररोज एकूण तीस एसटी गाड्याच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे रविवारी (ता.11) आठवडे बाजार व दिवाळी सणामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

आंबेगाव तालुक्यात मंचर बसस्थानकासाठी नारायणगाव व राजगुरुनगर आगारातून एसटी गाड्यांचा पुरवठा केला जातो. पण दिवाळी सण सुरु झाल्यानंतर एसटी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाखणगाव, महाळुंगे पडवळ, रांजणी या तीन गावच्या मुक्कामी एसटी गाड्या कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी बंद केल्या आहेत. महाळुंगे पडवळ गाडी रद्द केल्यामुळे साकोरे, टाकेवाडी, नांदूर, कळंब, कळंबई, लाखणगाव गाडी रद्द केल्यामुळे देवगाव, काठापूर, पारगाव व रांजणी गाडी रद्द केल्यामुळे खडकी फाटा, चांडोली बुद्रुक, चांडोली खुर्द, थोरांदळे, कारफाटा या भागातील व्यापारी व सनानिमित्ताने ये जा करणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय झाली आहे.

आंबेगाव तालुक्याचे मंचर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील बसस्थानकावर 150 हून अधिक गावे व वाड्या वस्त्यावरील प्रवाशांची वर्दळ असते. दरवर्षी दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंचर बसस्थानकावरून जादा एसटी गाड्या सोडल्या जातात. पण यावेळी मात्र जादा एसटी गाड्या सोडल्या नाहीत. नियमितपणे सुरु असणाऱ्या एसटी गाड्या व फेऱ्याही रद्द केल्या आहेत. मंचरहून पुण्याला जाणाऱ्या प्रत्येक एसटी गाडीत सरासरी 70 ते 80 प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. नाशिकहून पुण्याला ये जा करणाऱ्या शिवशाही एसटी गाड्या मंचरला थांबत नाहीत. तसेच एशियाड गाड्यामध्ये अधिक भाडे देवून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. ही गैरसोय थांबवून प्रवाश्यांच्या सोयीसाठी जादा एसटी गाड्यांची व्यवस्था करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र थोरात यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com