शिरूरमध्ये पासपोर्ट सेवाकेंद्राची शाखा - शिवाजीराव आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

शिरूर - शिरूरसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या तालुक्‍यांतील नागरिकांच्या ‘पासपोर्ट’साठी पुण्यात चकरा मारणे आता थांबणार आहे. येत्या महिनाभरात शिरूरमध्येच पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा सुरू होत आहे, अशी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज येथे माहिती दिली. 

शिरूर - शिरूरसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या तालुक्‍यांतील नागरिकांच्या ‘पासपोर्ट’साठी पुण्यात चकरा मारणे आता थांबणार आहे. येत्या महिनाभरात शिरूरमध्येच पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा सुरू होत आहे, अशी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज येथे माहिती दिली. 

शिरूरमध्ये पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा सुरू करण्यास केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आढळराव पाटील म्हणाले, ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघाबरोबरच; जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिक्षण, पर्यटन व इतर नोकरी आणि कामधंदेविषयक कामांसाठी परदेशांत जाणारांची संख्या मुळातच मोठी आहे. गेल्या काही वर्षांत या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या सर्व नागरिकांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज भासत असे. पुण्यातच ही सुविधा उपलब्ध असल्याने या सर्व नागरिकांना पासपोर्ट मिळविण्यासाठी पुण्याला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यात नागरिकांच्या वेळ व पैशांचाही अपव्यय होत होता. ही गरज ओळखून शिरूरसारख्या ग्रामीण भागात पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा असण्याची गरज केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली व केंद्रानेही ही गरज ओळखून तातडीने अशी शाखा शिरूरला देण्याबाबत मान्यता दिली.’’

शिरूर लोकसभा मतदारसंघ व नजीकच्या तालुक्‍यांतून सुमारे तीन हजार पासपोर्ट पुण्याच्या कार्यालयातून दरवर्षी वितरित केले जात असल्याची माहिती समजल्यानंतर या भागातच पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा असावी, असा विचार पुढे आला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तसेच परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या हे निदर्शनास आणून देताना, या शाखेची गरज त्यांच्या लक्षात आणून दिली. पासपोर्ट सेवा केंद्राच्या शाखेसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा केला. असे आढळराव यांनी सांगितले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची वाढती व्याप्ती, वाढते औद्योगीकरण, या भागातील वाढती लोकसंख्या, त्यातून परदेशी जाणाऱ्या नागरिकांची सरासरी टक्केवारी तयार केली. त्यासाठी गेली वर्षभर या भागाचा सर्वे केला. त्यातून तयार केलेला अहवाल परराष्ट्र मंत्रालयाला सादर केल्यानंतर सरकारने दखल घेत ही शाखा मंजूर केली.

महिनाभरात शिरूर येथील शाखेमार्फत प्रत्यक्ष पासपोर्ट वितरित करण्याचे नियोजन असून, त्यासाठी सध्या पोस्ट ऑफिसमध्येच पार्टिशन करून स्वतंत्र शाखा सुरू केली जाईल. त्यानंतर लवकरच नवीन जागेत या शाखेसाठी सुसज्ज कार्यालय उभे केले जाईल. 
- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

Web Title: Passport Service Center Branch in Shirur Shivajirao Adhalrao