‘फास्टॅग का स्लोस्टॅग’

अमर परदेशी
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

फास्टॅग यंत्रणेवर विश्‍वास नाही
फास्टॅग प्रणालीवर विश्‍वास नसल्याचे वाहनधारक सांगत आहे. अनेकदा टोलनाक्‍यावर टॅग स्कॅन होत नाही. रोख भरणा करूनही फास्टॅगच्या बॅंक खात्यातून पैसे वजा होणे असे अनेक प्रकार घडले आहेत.

फास्टॅग वाहनांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळण्यासाठी विशेष काळजी घेत आहे. फास्टॅग व रोख टोल भरणा करणाऱ्या मार्गिका दाखविण्यासाठी लांब अंतरावर कर्मचारी नेमले आहेत. फास्टॅग वाहनधारकांची संख्या वाढली की गर्दी आपोआप कमी होईल.
- वैभव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, टोल नाका

पाटस - दौंड तालुक्‍यातील पाटस टोल नाक्‍यावर फास्टॅग वाहनांची संख्या वाढल्याने गर्दी कमी होत असल्याचा दावा टोल प्रशासन करीत आहे. मात्र टोलनाक्‍याच्या विशिष्ट अंतरापर्यंत अजूनही वाहतूक कोंडी होत आहे. त्यात फास्टॅग असणाऱ्या वाहनांनाही थांबावे लागत आहे. त्यामुळे हा ‘फास्टॅग का स्लोस्टॅग’ आहे, असा सवाल आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाटस टोलनाक्‍यावर दोन्ही बाजूंच्या एकूण बारा मार्गिका आहेत. यापैकी आठ फास्टॅग मार्गिका, तर चार रोख टोलवसुली मार्गिका ठेवल्या आहेत. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता रोख टोल भरणा करणाऱ्या वाहनांना दोन मार्गिका तोकड्या ठरत आहेत. त्यामुळे रोख टोल देणाऱ्या वाहनांची रांग लांबपर्यंत जात आहे. यामध्ये फास्ट वाहनांनाही गर्दीत थांबावे लागते. वाहन कोंडीचा फटका वाहनधारकांबरोबर परिसरातील नागरिकांना जास्त सोसावा लागत आहे. सुटीच्या दिवशी टोलनाक्‍याच्या दुतर्फा कित्येक अंतरावर वाहनांच्या रांगा लागतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patas toll naka fastag issue