खड्डेच खड्डे चोहीकडे; गेली मनपा कुणीकडे? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पिंपरी : पाणीपुरवठा, महावितरण, एमएनजीएल, मोबाईलच्या केबल टाकणे आदी कामांसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालक व पादचारी हैराण झाले आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही डांबरीकरण होत नाही. महापालिकेचे अधिकारीही याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शहरात खड्डेच खड्डे असताना महापालिका कुठे गेली, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पिंपरी : पाणीपुरवठा, महावितरण, एमएनजीएल, मोबाईलच्या केबल टाकणे आदी कामांसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालक व पादचारी हैराण झाले आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही डांबरीकरण होत नाही. महापालिकेचे अधिकारीही याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शहरात खड्डेच खड्डे असताना महापालिका कुठे गेली, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
अंदमान निकोबारमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. सात- सात जून रोजी त्याचे महाराष्ट्रात आगमन होईल. त्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असताना, शहरात ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांचे अद्याप डांबरीकरण झालेले नाही. जर पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरण झाले नाही, तर सर्वत्र चिखल होऊन अपघात घडतील. याशिवाय खड्ड्यांमध्ये पाणी साचून नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होईल, असे बोलले जात आहे. 
शहरात चोवीस तास पाणीपुरवठ्याकरिता ठिकठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. भूमिगत केबल टाकण्याचेही काम महावितरणकडून सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर त्वरित रस्त्याचे डांबरीकरण करण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. 

  • खोदाईचे परिणाम 
  •  रस्ते झाले अरुंद 
  •  वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व पादचारी हैराण 
  • मातीवरून दुचाकी घसरून अपघात 
  • वाहतूक कोंडीत वाढ 

"खोदलेल्या रस्त्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहनांच्या गर्दीतून चालणेही मुश्‍कील जाते. अनेक ठिकाणी काम पूर्ण होऊनही डांबरीकरण झालेले नाही.'' 
-संगीता रूपटक्‍के, गृहिणी

"खोदलेल्या खड्ड्यांची माती रस्त्यावर टाकलेली आहे. या मातीवरून दुचाकी वाहने घसरून पडतात. वेळेत डांबरीकरण न झाल्यास चिखलामुळेही वाहने घसरून अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.'' 
-नितीन कर्डिले, वाहन चालक 

"पाणीपुरवठा आणि महावितरण या दोन्ही विभागांनी खोदलेले रस्ते ते स्वतः पूर्ववत करणार आहेत. तर अन्य रस्त्यांचे डांबरीकरण महापालिका करेल. संबंधितांना लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.'' 
अंबादास चव्हाण, शहर अभियंता, महापालिका 

 

Web Title: pathholes are everywhere and municipal corporation is ignoring this

फोटो गॅलरी