प्रशासकीय दिरंगाईत गुदमरतोय रुग्णाचा जीव

patient and their relatives are worried due to late response of covid 19 helpline
patient and their relatives are worried due to late response of covid 19 helpline
Updated on

पुणे : घरातील व्यक्तीची प्रकृती कोरोनामुळे बिघडल्याने बेडची शोधाशोध सुरू आहे. मग पालिकेच्या हेल्पलाईनला फोन करायचे प्रयत्न सुरू झाले. पण फोन बराच वेळ वेटींगवरच असल्याने नातेवाईकांची चलबिचल होते. फोन लागला तरी बेड कुठे उपलब्ध आहे, याची माहिती देण्यात तासभर जात आहे. या प्रशासकीय दिरंगाईमुळे रुग्णाचा जीव गुदमरत आहे. हा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी हेल्पलाईनची संख्या दहावर केली जाणार आहे. पुणे शहरात कोरोनाने थैमान घातले असून, रोज हजारो रुग्णांची भर पडत आहे. गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या साडे आठशेच्या जवळ गेली आहे. पुणे महापालिकेने खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, पुरेसे बेड नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.

महापालिकेने रुग्णांच्या मदतीसाठी पाच हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. त्यावर रुग्ण, त्यांचे नातेवाईक, ओळखीचे लोक फोन करून शहरात कुठे ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे का? व्हेंटिलेटर उपलब्ध आहे का? याची चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बराच वेळ फोन बिझी लागत असून, तेथील समुपदेशक रुग्णाची संपूर्ण माहिती डॉक्टरांना देत आहेत. डॉक्टर शहरातील रुग्णालयात कोठे बेड मोकळा आहे, तेथे संबंधित रुग्णाचे नाव देत आहेत. या प्रक्रियेस एका तासापेक्षा जास्त कालावधी लागत आहे. एकीकडे रुग्णाची प्रकृती गंभीर होत आहे, तर दुसरीकडे हेल्पलाइन सेंटरमधील प्रशासकीय दिरंगाईमुळे रुग्णांचा जीव धोक्यात जात आहे. अनेकजण हेल्पलाईनच्या भरवशावर न बसता वैयक्तिक संपर्क वापरून व हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करून बेड मिळेल का यासाठी प्रयत्न करत आहेत.

निकृष्ट ‘पीपीई’ किटमुळे डॉक्टरांना होतोय कोरोना

अशी आहे प्रक्रिया
हेल्पलाईनला फोन केल्यानंतर तेथील समुपदेशक त्यांना दिलेल्या प्रश्नावलीनुसार रुग्णाची माहिती घेतात. प्रश्नावली भरल्यानंतर तो कागद डॉक्टरांना दिला जातो. प्रश्नावलीवरून रुग्णाची स्थिती कशी आहे, यावरून ते त्यांना आवश्यक असलेल्या बेडची चौकशी रुग्णालयांकडे करतात. बेड उपलब्ध झाला की रुग्णाच्या नातेवाईकाला कोठे अॅडमीट व्हायचे आहे, याची माहिती दिली जाते.

रोज सुमारे ४५० कॉल
महापालिकेच्या हेल्पलाईनवर दिवसेंदिवस मदत मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या दिवसा साडे तीनशे तर रात्री दीडशे असे साडे चारशे कॉल येत आहेत. रुग्ण वाढीचा वेग पाहता, ही संख्या पाचशेच्या पुढे जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!
''महापालिकेने पाच हेल्पलाईन नंबर दिले आहेत, नागरिकांकडे कॉल वाढत असल्याने हेल्पलाईनची संख्या दहावर नेली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना लवकर माहिती मिळेल. तसेच खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेण्याची गती वाढवली असल्याने बेडदेखील उपलब्ध होतील.''
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com