पीएमपी बसथांब्यांवर ‘स्मार्ट वायफाय’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

पौड रस्ता - पीएमपीच्या स्थानकावर बसचे वेळापत्रक, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर देखरेख आणि प्रवाशांना मोफत वायफायचा आनंद लुटता येणार आहे. कारण आता कोथरूडमधील पीएमपीचे बसथांबे ‘स्मार्ट वायफाय’ बनले आहेत. तसेच येथे सीसीटीव्ही देखील बसविण्यात आले आहेत. 

कोथरूड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब मार्गावरील ‘स्मार्ट वायफाय’ बसथांब्याचे उद्‌घाटन वाहतूक पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हर्षवर्धन मानकर, उषा केळकर, आरोग्य निरीक्षक नरसिंह पटेल, योगिता रोकडे, अर्चना चंदनशिवे, रोहित मते, रामलाल कागेल, दिलीप कानडे, लायन नेताजी खंडागळे उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘‘या थांब्यावर सीसीटीव्ही लावण्यात आलेला आहे. त्यामुळे बेफाम वाहने चालविणारे, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवणे सोपे जाणार आहे. बसथांबा परिसरातील भुरट्या चोऱ्या, टिंगलटवाळी करणाऱ्यांना आळा बसण्यास मदत होईल.’’  

मानकर म्हणाले, ‘‘स्मार्ट थांब्यामुळे आपण डिजिटल युगाचा अनुभव येथे घेऊ शकतो. येथे लावलेल्या डिजिटल स्क्रीनवर बसचे वेळापत्रक, महापालिकेची माहिती, नगरसेवकांनी राबवलेल्या योजना, आगामी उपक्रम आदींची माहिती प्रवाशांना मिळू शकेल. एकावेळी पन्नास लोकांना येथील वायफाय सुविधेचा वापर करता येईल. प्रभाग अकरामध्ये मोरे विद्यालय चौक, पौड फाटा येथेही अशा प्रकारचे दोन बसथांबे सुरू करण्यात आले आहेत.’’

Web Title: paud road pune news smart wi-fi on pmp bus stop