

Traffic Diverted as Pavana River Overflows Near Birla Hospital in Thergaon
esakal
वाकड: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दत्तनगर, थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून डांगे चौक-चिंचवड हा महत्त्वाचा मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.