धरण ‘फुल्ल’; सोसायट्या तहानलेल्याच

Water-Supply
Water-Supply

पिंपरी - पावसाळ्यात पवना धरण भरले असतानाही शहरातील सोसायट्यांची तहान भागू शकत नाही. त्यामुळे सर्वच सोसायट्यांना टॅंकर मागवावे लागत आहे. पाण्याचा खर्च भागविण्यासाठी दोन महिन्यांत सोसायट्यांना ८१ लाख रुपये मोजावे लागल्याचे समोर आले आहे.

सोसायट्यांचा पाण्याचा प्रश्‍न सुटत नसल्यामुळे येत्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी सांगितले.

वस्तुस्थिती काय? 
उन्हाळ्यात शहरातील सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्‍यकता भासते. महापालिकेकडून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे यंदा पावसाळ्यातही सोसायट्यांना टॅंकर सुरूच ठेवावे लागले आहे. शहरात पाचशे ते एक हजार फ्लॅट असणाऱ्या मोठ्या सोसायट्यांची संख्या ३००च्या आसपास आहे. प्रत्येक सोसायटीला आपली गरज पूर्ण करण्यासाठी रोज १५ ते १६ टॅंकर मागवावे लागतात. उन्हाळ्यात ही संख्या दुप्पट असते. तसेच छोट्या सोसायट्यांना रोज तीन ते चार टॅंकर लागत आहेत. जुलैपासून टॅंकरची मागणी ५० टक्‍यांवर आली असून, सध्या निर्माण झालेली परिस्थिती फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे राजे यांनी स्पष्ट केले.

३ ते साडेतीन हजार हाउसिंग सोसायट्यांची संख्या
३०० मोठ्या सोसायट्यांची संख्या
८५० रुपये साध्या पाण्याचा टॅंकर
१२०० रुपये पिण्याच्या पाण्याचा टॅंकर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com