पवना धरणसाठ्यात सव्वा टक्‍क्‍याची वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पिंपरी - पवना धरण परिसरात १ जूनपासून ३४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात अवघी १.३ टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. सध्या धरणात २१.४६ टक्‍के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी दरमहा १० टक्‍के पाणी लागते. सध्या धरणात २१.४६ टक्‍के इतका पाणीसाठा शिल्लक असून, तो दोन महिने म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत पुरण्याइतका आहे. तर एक टीएमसी मृत पाणीसाठा असून, तो दोन महिने पुरू शकेल. एकूण ऑक्‍टोबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. 

दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने महापालिकेकडून पवना नदीपात्रातील केवळ पावसाच्या पाण्याचा उपसा केला जातो. पावसाचे पाणी कमी झाल्यानंतर धरणातून पाणी सोडले जाते. दरमहा १० टक्‍के लागणारे पाणी शहराला वर्षभर पुरते. पवना धरणात एक ते २३ जून या कालावधीत १९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या वेळी धरणात २०.१६ इतका पाणीसाठा शिल्लक होता.  

Web Title: Pawana Dam water level increase