रावेतमध्ये पुराचा धोका

Pawana-River
Pawana-River

पिंपरी - रावेतमध्ये पवना नदीपात्रात सर्रास भराव टाकण्यात येतो. त्यामुळे नदीचा श्‍वास कोंडत आहे. नाल्यातही भराव टाकण्यात आला आहे. येथे टाकलेल्या भरावावर दुकानेही थाटली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पूर आल्यास अपघाताचा धोका संभवतो. 

वाल्हेकरवाडी-चिंचवडहून रावेतकडे जाताना असलेल्या नाल्यावर छोटा पूल आहे. त्या नाल्यात सर्रास भराव टाकला जातो. याच्याविरुद्ध बाजूलाच नदी आहे. हा नाला नदीला येऊन मिळतो. पावसाळा सुरू झाला तरी महापालिकेच्या वतीने नाल्याची सफाईही करण्यात आलेली नाही. त्यात झुडपे, झाडेही उगवली आहेत. नदी आणि रस्ता यात थोडेच अंतर आहे. 

पात्रात भराव टाकून त्याचे सपाटीकरण करण्यात आले आहे. महावितरण कंपनीचा डिपीबॉक्‍सही या भरावावरच उभारण्यात आला आहे. पुराचे पाणी आल्यास हा भराव खचण्याचा धोका संभवतो. येथून पुढे डावीकडे वळल्यावर ठिकठिकाणी दुकाने आहेत. यापैकी काही दुकाने सर्रास भरावावर उभारण्यात आली आहेत. डावीकडील मोठ्या पुलालगतच्या नदीपात्रात भराव टाकून चक्क प्लॉटिंगही करण्यात आले आहे. पुराचे पाणी आल्यास सर्व भाग खचण्याचा धोका आहे. 

वाल्हेकरवाडीकडून रावेतकडे जाताना उजवीकडील गटाराचीही दुरवस्था झाली आहे. गटाराची सफाई होत नसल्याने कचरा आहे. गटाराची भिंतही ठिकठिकाणी खचली आहे. एके ठिकाणी तर ही भिंतच गटारात कोसळलेली दिसते. पावसाळा सुरू झाला तरी गटाराची सफाई करण्यात आली नसल्याने लगतच्या रहिवाशांना डासांचा उपद्रव होण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेने तातडीने नदीपात्रातील भराव काढून संबंधितांवर कारवाई करावी. जेणेकरून कोणी पुन्हा कोणी भराव टाकण्यास धजावणार नाही. अन्यथा पर्यावरणाचे गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे.
- नितीन साळी, नागरिक, चिंचवड

रावेत येथील संबंधित दुकानांवर यापूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. आता पुन्हा तेथे कारवाई करण्यात येईल.
- मकरंद निकम, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण विरोधी विभाग, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com