पवनेच्या घशाला जलपर्णीचा फास

Jalparni
Jalparni

पिंपरी - रावेत, थेरगाव, सांगवी परिसरात पवना नदीच्या घशाला अक्षरशः जलपर्णीचा फास बसला असून, त्यातून सुटका करण्याचे कोणतेही प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून केले जात नाहीत. शनिवारी मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत सापडल्यानंतर पुन्हा एकदा जलपर्णीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

थेरगावातील केजुदेवी बंधारा परिसरात बोटिंग चालविण्यात येते. या ठिकाणी बंधाऱ्यालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे.

बंधाऱ्यालगतच्या परिसरातच नदीतून काढलेली जलपर्णी टाकण्यात आली आहे. दोन किलोमीटरच्या परिसर जलपर्णीने वेढलेला असून, तेथे दुर्गंधी पसरली आहे. रावेत येथील नदीपात्राच्या भागामध्येही अनेक ठिकाणी जलपर्णी साठली आहे. सांगवीतील नदीपात्रातही तसेच चित्र नजरेस पडत आहे. 

पवना नदीमध्ये येणाऱ्या प्रदूषित पाण्याला चाप लावण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. या अगोदरदेखील पवना नदीत मासे मृत झाल्याचा प्रकार झाला होता. त्या वेळीही पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्याअगोदर पालिकेने नदीपात्रातील जलपर्णी काढून हा परिसर स्वच्छ करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने येथील समस्यांमध्ये भर पडताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com