पवना धरणग्रस्तांसाठी तरुणाचे पुण्यात उपोषण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

पवनानगर - सोमाटणे येथील पवना पुनर्वसन वसाहतीमधील समस्या व धरणग्रस्तांचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी शंकर ज्ञानेश्‍वर घरदाळे यांनी सोमवारपासून पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. घरदाळे हे मूळचे आंबेगावचे आहेत. संपूर्ण गाव पवना धरणात गेले. येथील धरणग्रस्तांना सोमाटणे येथे तीन गुंठ्यांचा प्लॉट (भूखंड) दिला आहे. त्यावर घरे बांधून नागरिक राहात आहेत; मात्र नागरी सुविधांपासून वंचित आहेत. त्याबाबत वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे उपोषण सुरू केल्याचे घरदाळे यांनी सांगितले. 

उपोषणास पाठिंबा
पवना धरणग्रस्त कृती समिती, पवना धरणग्रस्त परिषद, राजर्षी शाहू महाराज नगर रहिवासी संघ यांच्यातर्फे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, कार्याध्यक्ष बाळासाहेब काळे, राम कालेकर, आनंदा ओव्हाळ यांनी शंकर घरदाळे यांची भेट घेऊन बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला.

धरणग्रस्तांच्या मागण्या
    घरांपासून वंचित धरणग्रस्तांना भूखंड मिळावेत
    भूखंडासाठी अनावश्‍यक कागदपत्रे, जाचक अटी रद्द कराव्यात
    धरणग्रस्त वसाहतीतील अनधिकृत बांधकामे हटवावीत
    मार्केटच्या जागेत वारसांना स्वयंरोजगारासाठी जागा द्यावी
    पुनर्वसन कार्यालयाकडून एका भूखंडाच्या ऑर्डरवर दोन प्रकल्पग्रस्तांचा ताबा दर्शविला आहे, त्यात दुरुस्ती करावी
    सोमाटणे येथे धरणग्रस्त पुनर्वसन वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात
    शाळेच्या आवारात सोमाटणे ग्रामपंचायतीने सुरू केलेला कचरा डेपो हटवावा, मंदिराच्या जागेत बांधलेले स्वच्छतागृह हटवावे

Web Title: pawananagar pune news dam affected youth fasting