Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाहीत, याची गॅरंटी कोणी घेवू शकत नाही.
prakash ambedkar
prakash ambedkar esakal

Pune News : ‘‘लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाहीत, याची गॅरंटी कोणी घेवू शकत नाही. राजकारण हे इशाऱ्यांवर चालते आणि त्यांना इशारा मिळालेला आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भाजपशी मागील दरवाजातून चर्चा सरू आहे.

निवडणुकांनंतर ते एकत्र येतील अशी स्थिती आहे,’’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. वंचितकडून शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले डॉ. अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता. ५) ॲड. आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे हडपसर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ॲड. आंबेडकर बोलत होत.

डॉ. अन्वर शेख यांच्यासह वंचितचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘‘मोदी सरकारने देशाला मोठ्या संकटात आणून ठेवले आहे. एवढे असूनही मोदी यांची खरा चेहरा दाखविण्याची हिंमत कोणी करत नाही.

कारण त्यांना लगेच र्इडीची नोटीस जाते. पवार आणि ठाकरे हे स्वतःसाठी लढत आहेत. त्यांची लढार्इ सर्वसामान्यांसाठी नाही. भाजपला होणारे मतदान घटत आहे. त्यामुळे भाजपला हरविण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे.’’

‘‘शहर स्मार्ट करू, असे म्हणून चालणार नाही. स्मार्ट शहरांची कल्पना काय आहे, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. रस्ते वाढविण्याच्या पलिकडे शहरे स्मार्ट झालेली दिसत नाहीत. झोपडपट्टीतील नागरिकांचा विकास व्हायला हवा.

मात्र त्यांना बिल्डरांच्या भरवशावर सोडण्यात आलेले आहे. शहरांची नव्याने रचना करणे गरजेचे आहे. तसेच झाल्यास व्यापक विकास होवू शकतो,’’ असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

दोस्ती एकाशी लग्न दुसऱ्याशी अशी पवारांची नीती

‘‘शरद पवार यांची आत्ता दोस्ती एकाशी आणि लग्न दुसऱ्याशी अशी नीती आहे. त्यांना आता भाजपबरोबर लग्न करायचे आहे. निवडणूक झाल्यानंतर त्याचे चित्र स्पष्ट होर्इल. त्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे. मतदारांनी याचा विचार करून कौल द्यावा,’’ असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com